Home बातम्या “गुरुकृपा”चे सैनिकांना रक्षाबंधन

“गुरुकृपा”चे सैनिकांना रक्षाबंधन

2

पुणे येथील गुरुकृपा संस्था ही नोंदणीकृत संस्था असून, १९९४ पासून, गेली अठ्ठावीस वर्षे कार्यरत आहे. दीर्घकाळापासून ही संस्था ‘सैनिक नागरिक‘, ‘दोस्ती अभियान‘ चालवते. मा. श्री. पंकज नाथ महाराज यांच्या प्रेरणेतून हे कार्य घडत आहे.

आपल्यासारख्या नागरिकांचं रक्षण करताना स्वतः जायबंदी झालेल्या दिव्यांग सैनिकांसोबत संस्थेने यंदाची राखी पौर्णिमा अतिशय कृतज्ञताबुद्धीने साजरी केली. गुरुकृपा संस्था आणि सोहनतारा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट‘ आणि ‘पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर‘, खडकी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

सैनिकांना राखी बांधण्यासाठी पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून आर्या हेंगले, सुचेता सटाणे, सुकन्या निरगुडे, सुनिता कुलकर्णी, राधिका लढ्ढा, रोहिणी, करिष्मा रोडे, प्रमिला भोसले, स्वाती नवले आदी आल्या होत्या.

गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह श्री. प्रशांत थोरात यांनी प्रास्ताविकात नमूद केले, की, “जगातील प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून ‘तू माझं रक्षण कर’ अशी विनंती करते. पण सैनिकांना कुणी राखी बांधली अथवा न बांधली, तरीसुद्धा ते केवळ कर्तव्यभावनेने आपलं सर्वांचं रक्षण करीत असतात.”

सोहनतारा फाउंडेशनच्या सुजाता चौहान, ज्योती सुतार तसेच ‘क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट’च्या कॉन्स्टेबल बप्पा देबनाथ यांनी सुंदर गाणी गायली.

सर्व महिलांनी सैनिकांना जेव्हा राख्या बांधल्या आणि औक्षण केलं तेव्हा या सर्व जवानांच्या आणि अधिका-यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

याप्रसंगी आपल्या मनात दाटून आलेल्या विचारांना निजलिंगा आणि जोगिंदर कुमार या सैनिकांनी मुक्त वाट करून दिली. मेजर भोपाल सिंग यांनी काही कविता ऐकवल्या. सुधांशू निरगुडे, ओमकार लढ्ढा, आशुतोष हेंगले आणि अद्वैत यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायला मोलाची मदत केली. कर्नल वसंत बल्लेवार, कर्नल रतनकुमार मुखर्जी, ले. कर्नल भार्गव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फार मोठे सहकार्य केले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. मनापासून धन्यवाद, देवेंद्र साहेब…! ज्या सैनिकांमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला, त्यांना ही बातमी पाहून अगदी गहिवरून आलं…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version