Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यचहा : काही कविता

चहा : काही कविता

नमस्कार मंडळी.
आज जागतिक चहा दिन आहे. तसे तर आपल्याकडे पक्क्या चहा प्रेमींसाठी तर रोजच चहा दिन असतो म्हणा.
पण कदाचित विदेशात चहा अधिक लोकप्रिय व्हावा म्हणून चहा दिन साजरा करण्यात येत असेल. असो.

आजच्या चहा दिनानिमित्त चहा च्या काही कविता सादर करीत आहेत, सुचित्रा कुंचमवार, नवी मुंबई.
त्या शिक्षिका, कवयित्रीं, लेखिका, समुपदेशिका, निवेदिका, समाजसेविका, पोलीस मित्र अशा विविध भूमिका चोखपणे बजावित असतात. गेल्या १० वर्षांपासून त्या विविध साहित्य प्रकाराचे लेखन करीत असून जवळपास ४०० शिव अभंगाचे त्यांनी लेखन केले  आहे. अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

न्यूज स्टोरी टुडे परिवारात सुचित्रा कुंचमवार यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला तर मग, चहा घेता घेता वाचू या काही चहावर कविता ….
— संपादक

चहा

हवा प्रभात समयी
गरमागरम चहा
एक घोट त्याचा घेता
म्हणणार वाह अहा.. १

इलायची अद्रकाचा
स्वाद लागे फार छान
काळा चहा लिंबू चहा
विविधांगी चहापान.. २

टोस्ट बिस्कीट सोबत
चव लागे याची भारी
वेळ असो कोणतीही
चहासवे हवी खारी.. ३

सर्दी खोकला तापात
गुणकारी हे औषध
गोडी चाले कशाचीही
गूळ साखर नि मध.. ४

चहाप्रेमी आम्ही वेडे
म्हणण्याचे भूषणही
म्हणणारा सापडेना
मज चहा प्रिय नाही.. ५

अमृततुल्य चहा

तरतरी नि हुशारी
येण्यासाठी चहा
अमृताची गोडी
पिऊन तर पहा.. १

चहाचे नशेखोर
असतात भारी
कपभर पिऊन
दुसऱ्याची तयारी.. २

काळ वेळ कोणते
नाही याला बंधन
दिवसभर चढवा
चहाचे आंधण.. ३

स्वस्त नि मस्त
चहा लयी भारी
सोबतीला बिस्कीट
टोस्ट अन खारी.. ४

अमृततुल्य पेय
सर्वांनाच आवडे
कॉफीवाल्यांनाच
फक्त याचे वावडे.. ५

☕चहामृत☕

चहा वाटते मज अमृत
आजच्या आधुनिक युगात
रोज सकाळी एक कप चहा
वाटे सर्वांना हवासा हातात..

चहाचा मस्त गोड गोडवा
जिभेवर चवीत छान रेंगाळतो
गरमागरम असा बनलेला चहा
स्वतःकडे पहा आकर्षित करतो..

हिवाळा पावसाळा उन्हाळा
ऋतू असू द्या कोणताही
चहा कप समोर धरताच
कोणीच नाही म्हणत नाही..

चहाची ही तल्लफ मनाला
उभारी तजेला मिळवून देते
एक घोट चहाचा घेताच
शरीराला मस्त तरतरी येते..

अद्रक, इलायची वा मसाला
चहा कशाचाही तुम्ही बनवा
कोणत्याही वेळेला द्या चहा
चहाप्रेमी म्हणतील मला हवा..

चहाशी जुळले ऋणानुबंध
नाते घट्ट जुळवते छान
फक्कड चहा पिऊन आवडीने
करूया त्याचा मान सन्मान..

सुचित्रा कुंचमवार.

— रचना : सुचित्रा कुंचमवार. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं