चाराक्षरी काव्य रचना (८१)
वृत्तपत्र
आवडते
आजी आजा
निवडते
एके काळी
मजा येई
वृत्तपत्र
हाती देई
कोना कोना
वाचायचा
सर्व वृत्त
सांगायचा
काय झाले
घटनांचा
उल्लेखच
वाचकांचा
आद्य पानी
खास देती
मध्यावर
ठीक येती
घर हवे
स्वप्न जसे
लग्न वर
हवे कसे
जाहिराती
वारेमाप
ज्यांना नसे
कधी चाप
वस्तू नाना
प्रकाराच्या
सुट देती
आकाराच्या
वस्त्र सोन
अलंकार
खाणे पिणे
ये बहार
शेजारच्या
घरातून
पेपरास
मागवून
वाचकांना
मजा येते
शब्द कोडे
ज्ञान देते
मोबाईल
आला घरा
बातम्यांना
का विसरा
किती तरी
वाचकास
गुगलात
ज्ञान खास
आता मजा
येत नाही
मोबाईल
खोटी ग्वाही
चहा पित
गप्पा व्हाव्या
पेपरच्या
कथा याव्या
झाले जमा
इतिहास
वाचकांचा
झाला ऱ्हास
गुगलाचे
झाले वेडे
विसरले
गाव खेडे
पेपरला
राम राम
मोबाईल
आला धाम
धंदा झाला
त्यांचा खोटा
अभावात
भरे पोटा

– रचना : सौ शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800