साकव्य विकास मंच आयोजित अष्टाक्षरी काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रचनेचा पुरस्कार प्राप्त कविता🌹
थेंब थेंब हा पाण्याचा
हिऱ्या मोत्याच्या तोलाचा
जपू त्याला जीवापाड
खरा आधार जीवाचा ||
पाण्यासाठी डोळा पाणी
पाण्याविना होई ऱ्हास
पाणी रक्षी जीवनास
रक्षू आपण पाण्यास ||
पाणी हवे जगण्याला
कोंब उगे जळापोटी
पाणी अडवूनी भरू
माय धरणीची ओटी ||
पावसाच्या धारांतुनी
करी जीवन संवाद
चराचरा व्यापितसे
माय धरेचा आनंद ||
ध्यानीमनी जपू एक
मंत्र खास प्रगतीचा
पाणी अडवू जिरवू
मार्ग राष्ट्र विकासाचा ||
– रचना : ज्योत्स्ना तानवडे.
खुप यथार्थ, योग्य शब्दांत पाण्याचे महत्व कवितेत वर्णिले आहे. बक्षिसास पात्र अशीच आहे. मन:पूर्वक अभिनंदन जोत्स्ना तानवडे.