अष्टाक्षरी काव्य
वर्षा मागे जाती वर्षे
आहे ही रित पुरानी
हर एक वर्षी घडे
नव-नवीन कहानी
जुने सरता सरता
नव वर्षाची तय्यारी
त्याच्या सोबत येतील
आवहाने किती तरी
आवहाने पेलताना
नव सृजनाची नांदी
सुख शांती हवी आता
नको पैसा सोने-चांदी
बंधुभाव एकात्मता
जपू या नेटाने सारे
पेटलेल्या प्रश्नांवर
मग शोधूया उत्तरे
दरवर्षी मिळतात
कडू गोड आठवणी
मात करूनी त्यावर
जगू या प्रत्येक क्षणी
नव वर्षाचे स्वागत
नव चैतन्याने करू
पहा थोड्याच वेळात
वर्ष हे होईल सुरू
जुन्या घटनांची नको
आता ही पुनरावृत्ती
देश प्रगती करता
करू सारेजण कृती

– रचना : सौ.मानिनी महाजन. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान रचना
खुप छान …
खुप छान