तू आहेस आमचा
सर्वसामान्यांचा…
स्वतःला किती ही
आंबा म्हणावलास…
तू किती ही किमंतीने
स्वतःला फुगवलास..
अगदी आंब्याचा आकार
घ्यायचा प्रयत्न जरी केलास
तरी, आमच्यासाठी तू
टोमॅटोच आहे.
रोजचं जेवण तुझ्याविना
कसं रे जाईल…
होटल तर तुझ्याविना
बंदच राहिल…
ना टोमॅटो केचअप
ना टोमॅटो प्युरी…
तरी तूला सांगते..
तू आपला… तू आमचा…
आमचाच रहा..
राजाचा कधीतरीच मान
तूला तर सगळीकडे
रोजच मान,
तुझी खरी किंमत
तूचच जाण.
सामान्यतच आपण बरे.
प्रजा ती प्रजा.
राजा तो राजा….
त्याची असते रे
कधीतरीच मजा…

— रचना : सौ. पूर्णिमा शेंडे. चेंबूर
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

अरे व्वा…मस्तच आहे कविता.
पूर्णिमा, सध्या टोमॅटोचे जे भाव वधारलेय यावर या सामान्य टोमॅटोला पण कसं समजावायचा तू खरंच छान प्रयत्न केलाय कमाल आहे. तुझ्या प्रतिभेची…मस्त हलकी फुलकी सुंदरच आहे कविता.
अरे व्वा..कित्ती छान! टॉमेटो बद्दल ची काय खरीं हकिकत आहे ती हुबेहुब तु पेज वरती उतरवलें..क्या बात है…!!