महिला सक्षमीकरण, बाल शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक सहभाग ही तीन महत्त्वपूर्ण उद्दिष्टे लक्षात घेऊन सौअनुराधा रोडे यांच्या संकल्पनेतून ‘अनुसत्व फाऊंडेशन’ ची स्थापना करण्यात आली आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा या उदात्त हेतूने सुरु झालेला हा उपक्रम निश्चितच सामाजिक परिवर्तनाचा भक्कम पाया ठरेल.
या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ऍड. माधवीताई नाईक, माजी खासदार डॉ संजीव नाईक, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप लेले, मंडळ अध्यक्ष श्री निलेश पाटील, श्री हेमंत म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, समीर भोईर, बळीराम भोईर, प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव, सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने, नॅशनल अवॉर्ड विजेता दिग्दर्शक शंतनू रोडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पांडे, संस्कार भारतीचे श्री. मराठे, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. सोनाली लोहार, आत्मन च्या सौं. मंजुश्री पाटील, जेष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर आणि उल्हास कारले यांच्यासह रोटरी ठाणे च्या अध्यक्षा विभावरी मनीजी तसेच अनेक पदाधिकारी यांच्यासह भाजपा ठाणे येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
