Homeबातम्या'डेटॉन' मध्ये हनुमान जन्मोत्सव

‘डेटॉन’ मध्ये हनुमान जन्मोत्सव

हनुमान जन्मोत्सव काल देश विदेशात जोशात साजरा करण्यात आला.
तसा तो अमेरिकेतील, ‘डेटॉन’ विद्यापीठात ही अतिशय जोशात साजरा करण्यात आला.

या विद्यापिठामधील हिंदू मिनिस्ट्री आणि कॅम्पस मिनिस्ट्री यांच्या अध्यक्षतेखाली हा हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

विद्यापीठाच्या व्हर्जिनिया कॅटरींग हॉल मध्ये हा जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रथम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हनुमानाची पूजा केली. नंतर हनुमानाची मूर्ती पालखीत विराजमान करून भक्तीभावाने पालखी पूर्ण कॅम्पस मध्ये मिरवली गेली.

आरती, भजन, पूजा ध्यान झाल्यानंतर काही मान्यवरांची भाषणेही झाली. या जन्मोस्तावानंतर महाप्रसाद पण होता.

नाशिक येथील ‘साप्ताहिक सहस्त्रार्जुन’चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते, विलास कट्यारे यांचे चिरंजीव सुधीर यांच्यासह हिंदू मिनिस्ट्रीच्या चेतन देवरे, निधी पांड्या, स्वप्निल त्रिवेदी या सर्व सभासदांनी  या  जन्मोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.

पालखी चे डिझाईन तयार करून ती बनविण्याची जबाबदारीही सुधीर ने छान पैकी पार पाडली.

या जन्मोत्सवात जवळपास 50 विद्यार्थी, विद्यार्थिनीं सहभागी झाले होते.
त्या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– टीम एनएसटी. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६