नागपूर येथील डॉ बाळकृष्ण महाजन यांनी आता पर्यंत 108 वेळा रक्तदान करून एक नवीन कीर्तीमान स्थापित केला आहे.
डॉ महाजन यांनी रक्तदानाची सुरूवात 1978 पासून एन सी सी नेवलविंग मधून केली. एका अपघातात जखमी झालेल्या लोकांना रक्तदान करून त्यांनी त्यांचे प्राण वाचले. त्यांचा नंतर 50/- रूपये व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा पासून प्रेरणा घेऊन आतापर्यंत 108 वेळा रक्तदान केले.
डॉ महाजन यांनी मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली येथे रेडक्रास संस्थेत तसेच नागपूर येथील मेयो, मेडिकल कॉलेज, मातृसेवा संघ, जीवन ज्योती ब्लड बँक, हेडगेवार, आयुष्य व साईनाथ ब्लड बँक मध्ये रक्तदान केले आहे.
डॉ महाजन यांना 2006 आणि 2008 मध्ये रेल्वे महाप्रबंधक अवार्ड मिळाला आहे.
50 वेळा रक्तदान केल्यानंतर महानगर पालिकेच्या वतीने रक्तदान गौरव कार्ड देऊन सत्कार केला.
वर्षं 2018 मध्ये 95 वेळा रक्तदान केल्यानंतर जीवन ज्योती ब्लड द्वारा रेड अम्बेसेडर अवार्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
2019 मध्ये जयपूर येथे इंडियन बेस्टिज अवार्ड-2019 देऊन सत्कार करण्यात आला. 2019 मध्ये नाशिक येथे अखिल भारतीय सांस्कृतिक संस्थेमार्फत 101 वेळा रक्तदान केल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार व 5000/- रूपये रोख, स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ बाळकृष्ण महाजन यांनी युवकांना रक्तदान केल्यानंतर काही कमजोरी येत नाही उलट अजून आपलं ताजे रक्त वाढते म्हणून आपल्या वाढदिवसाच्या वेळी, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी जरूर रक्तदान करावे, असे आवाहन केले.
खरंच, आजच्या रक्त टंचाईच्या काळात डॉ बाळकृष्ण महाजन यांनी केलेले आवाहन आपण विचारात घेतले पाहिजे.
– देवेंद्र भुजबळ 9869484800.
डॉ. बाळकृष्ण महाजन यांना मानाचा सलाम🙏रक्त दाना सारखे जीवनदायी दान महान आहे. त्यांना मिळालेली पारितोषिके हया कार्यासमोर काहीच नाही. भुजबळ सरांनी नेत्रदान निमित्त लिहिलेला व निवडक लेख सर्वां समोर आणल्या बद्दल, खूप धन्यवाद!
उत्तम लेख