मुंबई येथील डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य व सहयोगी प्राध्यापिका, डॉ. यशोधरा श्रीकांत वराळे यांना नुकतेच “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अनेक अडचणींवर मात करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंड व अविरतपणे करणाऱ्या आपणासारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बालक मंदिर हायस्कूल, कल्याण – मुंबई येथे अमृत महोत्सवी वर्ष २०२३ या दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक कल्याण नागरिक आयोजित मा. प्रधान सर, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ यांच्या हस्ते “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
यावेळी साप्ताहिक कल्याण नागरीक चे संपादक श्री. मच्छिंद्र युवराज कांबळे, अतिथी संपादक प्रा. श्री . विलास पेणकर, प्रमुख सल्लागार श्री. हिरामणी भि. क्षीरसागर, डीसले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800