महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई येथील प्रख्यात एकता कल्चरल अकादमी तर्फे प्रसार माध्यमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवृत्त माहिती संचालक तथा ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ
यांना जेष्ठ अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते “नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. गिरगांव येथील साहित्य संघ नाट्यगृहात अन्य विविध पुरस्कार मान्यवर आणि शेकडो रसिकांच्या उपस्थितीत नुकतेच प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये प्रमुख पुरस्कार म्हणजे, बहुरंगी कलाकार नागेश मोरवेकर यांना “एकता कला गौरव पुरस्कार”, तर “रंग माझा वेगळा” मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे हिला “पदार्पण अभिनय पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध स्पर्धांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सचिव प्रकाश पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लोक कलेचे अभ्यासक प्रा अवधूत भिसे यांनी केले.
या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यापैकी कलाकार नागेश मोरवेकर व बाल कलाकार ऋतिका वाघ यांनी उस्फूर्तपणे सादर केलेले
“जाऊ द्या ना बाळासाहेब” या चित्रपटातील अजय – अतुल यांचे संगीत असलेले व सत्कारमूर्ती नागेश मोरवेकर यांनीच गायलेले “डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डिजे ला” हे गीत व नृत्य दिलखेचक ठरले. त्यांच्या अदाकारीने सर्व रसिकांची दाद मिळवली.
अल्प परिचय
देवेंद्र भुजबळ गेली ४० वर्षे प्रसार माध्यमांमध्ये सक्रिय आहेत. नगर च्या दैनिक समाचार मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा रितसर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दै.केसरी, सा.सह्याद्री या वृत्तपत्रांत काम केले.
पुढे भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी ते माहिती संचालक या सर्व पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते विविध विषयांवर व्याख्याने देत असतात. तसेच लेखनही करीत असतात.
श्री भुजबळ सध्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल चे संपादक आहेत. हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून त्याला आतापर्यंत ४ लाख ७६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या बद्दल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विकास पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘चौथा स्तंभ’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
नमस्कार मंडळी.
आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल मन:पूर्वक आभारी आहे.
आपला लोभ असाच कायम असू द्या,ही आग्रहाची विनंती.तसेच आपल्या कल्पना,सूचना ही अवश्य कळवा.
भुजबळ सर आपले मनापासून खूप खूप अभिनंदन, आपले कार्य नक्कीच प्रेरणादायी व प्रशंसनीय आहे.💐💐🙏🙏
आदरणीय देवेंद्रजींना मानाचा समजला जाणारा एकता
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच विकास पत्रकारितेतील
योगदानाबद्दल मान.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तेही भव्य
सत्कार करण्यात आला त्याबद्दल श्री.देवेंद्रजी भुजबळ
यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई.
अभिनदन देवेंद्र!
🙏भुजबळ साहेबांचे एकता पुरस्कार निमित्त अभिनंदन 💐, अनेक शुभेच्छा 😊👍
भुजबळ साहेब
आपले अभिनंदन. आपण कायम दुसऱ्यांच्या कार्याचा गौरव करता.लेखकांना प्रकाशझोतात आणता.अडलेल्या नडलेल्या व्यक्तींना मार्ग दाखवता त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपणांस विविध सन्मान प्राप्त होत आहेत.यापुढेही आपणांस अधिक मोठे पुरस्कार लाभो आणि आपणांस दीर्घआयुष्य व चांगले आरोग्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
दिलीप प्रभाकर गडकरी
श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांचं गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने मनापासून अभिनंदन…!!!