हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वाचू या २ कविता. मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
हॉकी खेळाडू महान
ध्यानचंद ते मेजर
जन्मदिन त्यांचा आहे
राष्ट्र क्रीडा दिन थोर
२९ ऑगस्ट या दिनी
करु साजरा हा दिन
होऊ समर्पित आणि
ध्यानचंदांना वंदन
पुरस्कार खेळातील
आज देऊ खेळाडूंना
स्पर्धा आयोजित करु
महत्व देऊ खेळांना
खेळ संस्कृतीची कास
करु प्रचार प्रसार
संघ भावना वाढती
महती खेळांची थोर
खेळातील प्रगतीने
ठरे प्रगती राष्ट्राची
जिद्द, चिकाटी, प्रयत्न
वाढ होते या गुणांची
— रचना : सुधीर शेरे. डोंबिवली.
२. असे होते ध्यानचंद
ध्यानचंद म्हणजे…..
*मे* हनत दिवस रात्र करणारे
*ज* गात हाॅकीत गाजलेले
*र* मूनी हॉकी खेळणारे
असे होते ध्यानचंद !! १ !!
*ध्या* न, श्वास हाॅकी वर
*न* थकता खेळणारे
*चं* दनापरी झिजणारे
*द* मलेल्या खेळाडूंना उत्साहित करणारे
असे होते ध्यानचंद !! २ !!
*सिं*’हाप्रमाणे गरजणारे
*ह* सत खेळत खेळाडूंचे
मनोधैर्य वाढविणारे
असे होते ध्यानचंद !! ३ !!
–– रचना : विलास देवळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
🏋️♀️🤸♀️⛹️♂️🤾♂️🏌️🏇 🤽