आकाशीच्या देव्हाऱ्यात
निळी नीळाई दांटली
निळया देखण्या कान्हाला
तीट काळी ही लागली।
नभ निळे श्याम निळा
निळी ही नवलाई
निळया नभात लपली
गोड़ कान्हाची अंगाई।
निलनीळे मोरपीस
तुझ्या डोईस बांधले
निल कमल हातात
कसे सुंदर शोभले।
रूप सुंदर सांवळे
माझ्या कान्हाचे गोजीरे
निळया जळाचे दर्पण
कसे दिसते साजरे।

– रचना : अनुपमा मुंजे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800