स्वतःचे बाल रुग्णालय चालवत असतांनाच विविध प्रकारच्या माध्यमातून बाल आरोग्यासाठी जन जागृती करण्यासाठी विरार येथील डॉ हेमंत जोशी व सौ अर्चना जोशी प्रसिद्ध आहेत.
जोशी दाम्पत्याचा आरोग्य शिक्षणात नेहमीच पुढाकार असतो.
देशातील बाल मृत्यूंची भयावह संख्या रोखण्यासाठी आणि बाल आरोग्य जागृतीसाठी डॉ जोशींनी
२०१६ मध्ये मराठी पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या ९००० प्रती त्यांनी सार्वजनिक क्षेत्राला विनामुल्य भेट दिल्या.
या पुस्तकात जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार दिले आहेत. हेच सरकार वापरते. वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर व परिचारिकांना हेच उपचार शिकवले जातात.
आज आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी
आहे. देशात ९ हिंदी भाषी राज्ये आहेत. देशात ५५% म्हणजे ७७ कोटी लोक हिंदी जाणतात. हिंदी भागात बाल मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन डॉ जोशी यांनी त्यांच्या मराठी पुस्तकाचे हिंदीत रूपांतर केले आहे.
हिंदीत रुपांतर केलेले सदर पुस्तक डॉ हेमंत व अर्चना जोशी यांनी नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया यांना नवी दिल्लीत प्रदान केले. यावेळी खासदार डॉ विकास महात्मे, डॉ गिरीश चरडे व डॉ सतीश तिवारी उपस्थित होते.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, व आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनाही हे पुस्तक प्रदान करण्यात आले.
मराठी व हिंदी पुस्तकाने वैद्यकीय शिक्षण सोपे होईल असा विश्वास डॉक्टर जोशी यांना वाटतो. ही दोन्ही पुस्तके जागतिक आरोग्य संघटनेच्या वेब साईटवर मोफत उपलब्ध आहेत.
या पुस्तकाचे क्य्रू आर कोड पुढे दिले आहे. ते स्कॅन करून आपण मोबाईल फोन वरून संबंधितांना पाठवू शकता.
डॉ जोशी दाम्पत्याने सेवाभावी वृत्तीने हाती घेतलेल्या बाल आरोग्याच्या कार्यात आपणही सहभागी होऊ या.

.- लेखन : निरंजन राउत. निवृत्त वरिष्ठ सहाय्यक संचालक, माहिती विभाग, मंत्रालय, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.