भारतीय संविधान
असे श्रेष्ठ जगी
शिल्पकार संविधानाचे
होऊन गेले बाबासाहेब त्यागी
अवघ्या ब्रह्मांडात तळपतो
सूर्य तेजस्वी भारतीय संविधानाचा
आचंद्रसूर्य करू जयघोष
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
नको कुणावर अन्याय
मिळो सकला सदासर्वदा न्याय
गोरगरिबांना स्त्री शुद्रांना
दलितांना मिळो इथे अभय
मानव धर्माचे अमृत दिधले
डॉ.आंबेडकरांनी जनतेला
देव मानू देशाला
कोटी कोटी वंदन भारत मातेला
हक्क आणि कर्तव्याचे
करू सदैव पालन
नको उगाच भेदाभेद
दलित मराठा ब्राह्मण
एकाच आईची लेकरे आपण
राष्ट्रैक्याचे करू जतन
राष्ट्रद्रोही, अतिरेकी, भ्रष्टाचारी
या राक्षसांचे करू निर्दालन
राष्ट्राचा विकास
हाच ठेवू मनी ध्यास
तन मन धन
अर्पण करू राष्ट्रास
जिद्द चिकाटी सचोटी देशभक्ती
प्रामाणिकपणा अंगी बाणू
ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचे
धरू हाती सुकाणू
स्त्रीभ्रूणहत्या,निरक्षरता, अस्वच्छता
अंधश्रद्धेचेही करू निर्मूलन
बलसागर होवो भारत महासत्ता
फुलवू हिरवे नंदनवन
एक दिलाने गाऊ
महिमा संविधान दिनाचा
करू जयघोष वंदे मातरम् जय हिंद
आचरणात आणू संदेश देशभक्तांचा
सव्वाशे कोटी भारतियांना
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानदेवांच्या पसायदानाप्रमाणे
पूर्ण होवोत सर्वांच्या सर्व इच्छा
– रचना : राजेंद्र वाणी
आदरणीय भुजबळ सर आणि राजेंद्र वाणी सर
नमस्कार
फार सुंदर कविता