मन पाखरू पाखरू
उधळत चोहीकडे
खुंटा भक्तीचा बांधला
धाव त्याची बाह्याकडे
वाटे मनास गुंतावे
कल्पनेच्या कुंचल्यात
स्वप्न रंगी रंगलेल्या
आठवांच्या कलशात
मान पाखरू पाखरू
नसे त्याला ठेहराव
नसे कोणतेही रूप
नसे कोणता पेहराव
अरे मनाच्या पाखरा
नको उधळू तू असा
विचारांच्या चिखलात
गुंतू नको तू फारसा
मना लागू दे रे छंद
तुला विठ्ठल नामाचा
नको जाऊ इथे तिथे
नाही भरोसा देहाचा

– रचना : सौ. अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹सुंदर कविता. मनाचा ठाव कुणाला घेता येत नाही.
मन हे स्वछंदी असतं 🌹
🌹धन्यवाद 🌹