Saturday, January 31, 2026
Homeबातम्यामहानगर संमेलनास मोठ्या संख्येने या ! - प्रतिभा सराफ

महानगर संमेलनास मोठ्या संख्येने या ! – प्रतिभा सराफ

48 वे महानगर साहित्य संमेलन येत्या शनिवारी होत असून या संमेलनास साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी केले आहे.

प्रतिभा सराफ

गिरगाव येथील साहित्य संघाच्या डाॅ. अ. ना. भालेराव सभागृहात होणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होईल. हास्यजत्रा फेम ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी अध्यक्षस्थान भूषवतील. तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा तांबे स्वागताध्यक्ष असतील.

या संमेलनाची माहिती देताना प्रतिभा सराफ यांनी सांगितले की, या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे “मुंबई आणि मुंबईतील लोकल ट्रेन” यावर दिवसभर विविध सादरीकरण होणार आहेत. शाहीर निलेश जाधव यांच्या मुंबईच्या पोवाड्याने सकाळी ९ वाजता संमेलनास प्रारंभ होईल. संकेत तांडेल लिखित “लोकल” ही एकांकिकाही सादर होणार आहे. ‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, महापालिका पुरातत्व खात्याचे माजी अधिकारी संजय सावंत आणि ज्येष्ठ अभ्यासक अरुण पुराणिक सहभागी होणार आहेत. गोविंद नारायण माडगावकर यांच्या मुंबईचे वर्णन आणि नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन अभिनेता दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद करणार आहेत. “मुंबईतील खाद्य संस्कृती” यावर ज्येष्ठ संपादक संजीव साबडे तर “मुंबईतील वाचन संस्कृती” यावर संपादक मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक रंगणार आहे. संमेलनाचा समारोप लोकलमधील रिल स्टार सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनांनी होईल.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9