नवीमुंबई सानपाडा येथील प्रसिद्ध अशा मिलेनियम टॉवर्सच्या, सह्याद्री गृहनिर्माण संस्थेतील युवकांनी पुढाकार घेऊन श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. या निमित्ताने सात दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
युवकांनी पुढाकार घेऊन श्री गणेशाची केलेली प्रतिष्ठापना, विविध कार्यक्रमांचे सुव्यवस्थित आयोजन केले. यावेळी लहान मुलांच्या चित्रकला, मल्ल खांब, महिलांच्या पाककला स्पर्धेचे उत्तम रित्या आयोजन करण्यात आले, तर महिलांनी मराठी, हिंदी, सिंधी, तसेच दाक्षिणात्य भाषेमध्ये विविध भजन गायली आणि विविधता मध्ये एकतेचे दर्शन घडविले.

दरम्यान एक दिवस सकाळी अथर्वशीर्ष पठण सुद्धा करण्यात आले होते. सर्वांनी आपला हिरीरीने यात सहभाग नोंदवला. कराओके गाण्याने सर्वांना मोहित केले.

चौथ्या दिवशी “56 भोग”चे उत्तम रित्या आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे सर्वांनी विविध पदार्थांचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतला. तसेच या वेळी सर्व महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम करण्यात आला.
रोज सकाळ संध्याकाळ सोसायटी मधील सर्वांना आरती नंतर वेगवेगळा प्रसाद, तर पाचव्या दिवशी आणि विसर्जनाच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध रीतीने करण्यात आले. त्यांना मिळालेली सर्व रहिवाश्यांची साथ, यामुळे विविध धर्माचे, प्रदेशाचे, भाषांचे नागरिक रहात असलेल्या, २२५ सदनिकांच्या गृहनिर्माण संस्थेतील वातावरण आठवडाभर अतिशय प्रफुल्लित, मंगलमय आणि परस्पर सद्भावाचे होते.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोस्तव सुरू केला, त्याचे जणू दर्शनच झाले.
ज्येष्ठांची भेट : या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तसेच सर्व युवकांचे कौतुक करण्यासाठी सतत सक्रिय असलेल्या “सानपाडा जेष्ठ नागरिक संघा”च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आवर्जून भेट दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे यावेळी अध्यक्ष श्री मारुती कदम, उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे, खजिनदार श्री व्ही जी मुखेकर, सदस्य सर्वश्री कामगार नेते श्री मारुती विश्वासराव, श्री गव्हाणे, श्री वाजे, श्री देवेंद्र भुजबळ आदी उपस्थित होते.
युवक सर्वश्री भूषण म्हसे, मिहिर बोरा, आदित शेट्टी, नितेश वाणी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर करण्यात आलेल्या आदरातिथ्याने सर्व मान्यवर भारावून गेले.

विशेष म्हणजे या गणपती बाप्पाच्या ओढीने आदित शेट्टी जर्मनीहून तर नितेश वाणी बंगलोर येथून आले आहेत.
विसर्जन : बाप्पाचे विसर्जनावेळी सर्वांनी लेझीम वर ताल धरला, नंतर बाप्पा च्या विसर्जना अगोदर ५१ जणींनी घरून दिव्याचे फुलांनी सजवलेले ताट तयार करून आरती केली. अतिशय मनमोहक दृश्य होते ते.

गणेशोत्सवाच्या या सात दिवसाचे पूर्ण उत्तम नियोजन आणि या साठी सौ मीना वोरा, सौ रितू मित्तल, सौ गिरिजा पाटील, सौ रिमा शर्मा, सौ मंजूला बरनवाल, सौ नारायणी राऊत, सौ भारती रेड्डी या महिलांनी ; अश्विनी म्हसे, ख्याती बोरा, सृष्टी धवले, गार्गी सावंत, शुभ्रा मित्तल, श्वेता वाणी, निशा मूल्या, सुहानी नलगे, देवयानी गिरीधर या युवतींनी आणि भूषण म्हसे, मिहिर बोरा, आदित शेट्टी, नितेश वाणी, हृदय बाफना, सुमेध मूल्या, अमन शेट्टी या युवा कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेऊन गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडला.
खरं तर आजकाल ची युवापिढी डिजिटल युगात वावरतात, त्यांच्या व्यस्त दिनचर्येत वेळ काढून गणेशोत्सव सणामध्ये आरत्या, स्तोत्र, पूर्ण उत्सव शास्त्रोक्त पद्धतीनं कसा होईल याकडे पूर्ण लक्ष देऊन, मनसोक्त आनंद घेत होते. आजची युवापिढी बिघडली आहे, मोबाईल च्या आहारी गेली आहे हा समज खोटा असल्याचे दिसून आले.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
Uttam karyakramnchi aakhni,utsaha aani sunder lekadware sir aapan kelele vishleshan👌👌👌👌🙏