माजी राष्ट्रपती डॉ अबुल कलाम यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना अष्टाक्षरी रचने द्वारे आदरांजली….
सर्वोत्तम राष्ट्रपती
न्याय निष्ठ प्रशासक
थोर अणु संशोधक
वैज्ञानिक विकासक
झाला जन्म रामेश्वरम
तामिळनाडूचे पुण्य
वैज्ञानिक राष्ट्रपती
मायबाप झाले धन्य
वृत्तपत्र विक्री करी
परिस्थिती ती बेताची
उच्च शिक्षण घेऊनी
कार्य ती राष्ट्र हिताची
“मिसाईल मॕन” अशी झाली
तयांची ओळख
केली यशस्वी चाचणी
दिली जगाला झलक
होते ते भारतरत्न
झाले पद्मविभूषण
देश विदेशात कीर्ती
अणू चाचणी मिशन
क्षेपणास्त्र घडवले
संरक्षण सिद्ध केले
राष्ट्रपती पदालाही
सर्वोत्तम न्याय दिले
असे कोहीनुर रत्न
पुन्हा होणे शक्य नाही
जयंतीच्या निमित्ताने
काव्य पुष्प वाही
– रचना : गणेश सदाशिव साळवी. इंदापूर – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान