सामुराई व्हिलेज
सामुराई म्हणजे एक प्रकारचे प्रशिक्षित रक्षक. सामुराई ही जपानची विशिष्ट स्व संरक्षण पद्धती आहे. या पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणारी व्यवस्था म्हणजे एक प्रकारची आपल्या कडची गुरुकुल शिक्षणपद्धतीच होय.
आता या घरांमध्ये कुणी रहात नाही. मात्र सर्व घरांचे जतन छान करण्यात आले आहे. सर्व घरांजवळून एक कालवा गेलेला आहे त्याचा उपयोग दैनंदिन पाणी व्यवस्था तसेच सर्व घरे पूर्णपणे लाकडी असल्यामुळे आग लागल्यास ती विझवता यावी या साठी होत असे, असे आमच्या गाईड ने सांगितले.
आता येथील काही घरांमध्ये दुकाने सुरू करण्यात आली आहे. तिथे आपण विविध वस्तू, स्मृतिचिन्ह यांची खरेदी करू शकतो.
हा सर्व परिसर पहात असताना मला, आम्ही पुणे येथील फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट मध्ये प्रशिक्षण घेत असताना, आम्हाला दाखविण्यात आलेला, थोर जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसेवा यांनी दिग्दर्शित केलेला “सेवन सामुराई” हा क्लासिक चित्रपट आठवत राहिला.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869454800
सामुराई ही जपानी संस्कृतीतील जुनी पध्दत. पण तिचे जतन ज्या पध्दतीने केले ते स्पृहणीय आहे.तुमची लेखन शैलीही सुरेख आहे.
मस्त मस्तच…जपानी टुरच्या प्रत्येक ठिकाणचे बारकाईने केलेले माहितीपूर्ण
निरीक्षण वाचनीय तर आहेस पण संग्रहित ठेवावे असे आहे. तुम्ही लिहा भूजबळ सर. आम्हांला वाचायला नक्कीच आवडते.