शिकारागावा हेरिटेज व्हिलेज
सर्व जपान जरी आज अत्याधुनिक दिसत असले तरी त्यांनी त्यांची परंपरा कसोशीने जपली आहे. त्याचे उदाहरण द्यायचं झालं तर शिकारागावा हेरिटेज व्हिलेज चे देता येईल.
येथील घरांवरून या पारंपरिक गावातील पारंपरिक घरं कशी होती, आहेत, याची कल्पना येते. एक तर या घरांची उंची खुप आहे. तसेच हिवाळ्यात इथे पूर्ण बर्फ असतो.
त्यामुळे बहुधा घरांचे छप्पर जवळपास दोन फूट रुंद असते. या गावाला युनेस्को ने हेरिटेज व्हिलेज असा दर्जा दिला आहे. इथे देश विदेशातून आलेल्या पर्यटकांची चांगलीच वर्दळ होती.
इथे अजूनही काही घरांमध्ये लोक रहात आहेत. तर बऱ्याचशा घरांमध्ये दुकाने सुरू करण्यात आली आहेत.
कानाझावा शहरापासून हे गाव रस्तामार्गे एका तासाच्या अंतरावर आहे.
हे गाव पाहून आम्ही पुन्हा कानाझावा शहरात आलो आणि “रोटी” या भारतीय हॉटेल मध्ये मस्त पंजाबी जेवणाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे “रोटी” मध्ये खाल्लेली रोटी इतकी मस्त होती की, भारतातही अशी रोटी कधी खाल्ल्याचे मला आठवले नाही !
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800
मेरा जुता है जपानी ह्या मालिकेतून देवेंद्र भुजबळ सरांच्या नजरेतून जपानचे नैसर्गिक सौंदर्य आणि अभियांत्रिकी विकास ह्यांचे दर्शन घडत असल्याने मनापासून आनंद होत आहे. सरांचे हे प्रवासवर्णन भविष्यात एक दर्जेदार पुस्तक म्हणून नक्कीच गाजणार! त्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
अरे व्वा…खुप छान आहे…व्हिलेज