राग भीमपलास किंवा भीमपलासी
भीमपलासी किंवा पलासी हा हिंदुस्थानी शास्त्रीय राग आहे. राग भीमपलासी हा काफी थाटाचा आहे.
राग भीमपलासी हा आजच्या रागांपैकी एक अतिशय गोड आणि मधुर राग आहे. आलापा द्वारे प्रारंभिक विकास अतिशय कलात्मक पद्धतीने केला जातो. षडज-मध्यम आणि पंचम-गंधार स्वर खास मींडसोबत घेतले आहेत. त्याचप्रमाणे निषाद घेताना षड्जाचा स्पर्श आणि गंधार घेताना मध्याचा स्पर्शही मींड बरोबर घेतला आहे. या रागात श्रुतीमध्ये निषाद कोमल गायला आहे, त्यासाठी खूप रियाज करावा लागतो. हा पूर्वांग प्रधान राग आहे व तिन्ही सप्तकांत विस्तारला जातो.
हा गंभीर स्वरूपाचा राग आहे. हा राग अलंकार आणि भक्तीने परिपूर्ण आहे. या रागात ध्रुवपद, ख्याल, तराणे इत्यादी गायले जातात. कर्नाटक संगीतात अभेरी नावाचा राग या रागाशी मिळताजुळता आहे. काफी थाटाचा राग धनश्री, भीमपलासी सारखाच आहे. पण धनश्रीमध्ये वादी स्वर म्हणून पंचम आहे तर राग भीमपलासीमध्ये वादी स्वर मध्य आहे.
राग भीमपलासी मधील चित्रपट गाणी
1) नैनों में बदरा छाए
२) समय ओ धीरे चलो
3) आज पुरानी राहों से, कोई मुझे आवाज़ न दे
4) तू है फूल मेरे गुलशन का
5) तुम मिले दिल खिले
6) आ नीले गगन तले प्यार हम करें
7) आज मेरे मन सखी बन्सुरी बजाये कोई
8) दिल के तुकडे तुकडे
9) दिल में तुझे बिठाके
10) बिना मधुर मधुर कच्छू बोल.
11) एरी मैं तो प्रेमदिवानी
12) किस्मत से तुम हम को मिले हो
13) मन मोर हुआ मतवाला
14) कुछ दिल ने कहा
15) हे निर्दई प्रीतम
16) मैंने चाँद और सितारों की
17) ए री में तो प्रेम दीवानी,मेरा दर्द न जाने कोय – चित्रपट: नवबहार
18) मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबान -चित्रपट: अब-ए-हयात
१९) ये न थी हमारी क़िस्मत के विसाल-ए-यार होता – चित्रपट: मिर्झा गालिब
20) जिंदगी में तो सबी प्यार किया करते हैं (गीत)
21) एली रे एली – चित्रपट: यादें
22) ए अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से – चित्रपट : दिल से
23) दुनिया से जी घबरा गया- चित्रपट: लैला मंजू
24) खिलते हैं गुल यहाँ – चित्रपट : शर्मिली
25) मेरे मन का बावरा पंछी – चित्रपट : अमरदीप

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800