निसर्गाच्या कुशीत,
कोकण माजो गाव,
लाल मातीत सोबता,
हिरव्या हिरव्या रान ।
वाकड्या तिकड्या रस्त्यान,
वळणा घेयत धावता,
लाल माती उदळीत,
परी घाट उतारता ।
फाटफटी घर सोडता,
उजाडूक तिटयार येता,
सगळ्यांक निवांत चढवता,
सुसाट धावक लागता ।
मदीच रस्त्यात येनाऱ्याक,
मायेन आत घेता,
गर्दीक जूगारून,
सगळ्यांक सोबत घेता ।
आडया तिडया वळणांवर,
गुरगुरून धूर सोडता,
वेगार ब्रेक लावीत,
मकाम पार करता ।
ठरलेल्या येळेत येता,
तुजीच विचारपूस करीत,
बेल दिता कनडक्टर,
फूडल्या वाटेक लागता ।
कोसाकोसाची अंतरा,
बिनचूक येळेत गाठता,
मातयेचो थर लपेटून,
लाल लाल होता ।
आंब्या फणसाची ओजी,
खुशाल टपार घीता,
दगड धोंड्याच्या रस्त्याक,
दोस्त आपलो मानता ।
नागमोडी वळणा,
अचूक पार करता,
हिरव्यागार कोकनाक,
नियमित सेवा देता ।
हॉर्नच्या आवाजान,
शेतात येळ कळता,
कोकणातलो शेतकरी,
भाकरी खावक बसता ।
सणासुदीच्या दिवसात,
पावणेरावळे आनता,
साता समुद्रा पल्याडचे,
निरोप घेवन येता ।
कोकणातल्या भोळ्या भाबड्याची,
आसस लाईफ लाईन,
कोकणातल्या दऱ्याखोऱ्यात,
दिसतस लालपरी सोबून ।

रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
कोकण दर्शन..