Friday, October 18, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात..या सदरात आपलं स्वागत आहे. पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक

दूरदर्शन चे निवृत्त उप महासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांनी लिहिलेल्या “दूरदर्शनची पासष्टी : कृषि विकासात दूरदर्शनचे योगदान” या मुद्देसूद, आटोपशीर लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. देवेंद्रजी, माझ्या आठवणीत श्री शिवाजी फुलसुंदर यांनी ते जेंव्हा परदेश वारी करून आल्यावर आपल्या पोर्टल वर त्यांचा एक् वाचनीय लेख आणि छायाचित्रे आपण प्रसिद्ध केली होती.
किती काळ लोटला आहे हे सांगता येणार नाही पण आठवणी मात्र सदैव ताज्या आहेत.जो तब्येत राखतो तोच भविष्यातले इमले उभे करू शकतो.
व्वा, शिवाजीराव देशातील कृषी विकासाच्या उत्तरोत्तर होत गेलेल्या प्रगतीचा आढावा तर मोजक्याच शब्दात जनतेसमोर ठेवताना त्यात दूरदर्शनने सुरवातीपासून पासष्ट वर्षाच्या सहभागात किती मोलाचं योगदान केले याचाही धावता आढावा चपखलपणे घेतला आहे. मानले तुम्हाला. जग आनंदाने जगण्यासाठीच आहे.

  • — प्रकाश पळशीकर. पुणे.

२. वाचला लेख…उत्तम लिहीलाय. दूरदर्शनच्या आरंभीच्या काळापासून आत्तापर्यंत, या माध्यमाद्वारे देशात होत असलेल्या कृषीविषयक विकासकामाचा चढता आलेख समजला. त्यासाठी सरकारी पातळीवर सातत्याने होत असलेले प्रयत्न, त्यातला तुझा प्रत्यक्ष सहभाग…केवळ मुंबई दूरदर्शनच नव्हे,तर भारतात ज्या केंद्रावर नेमणूक झाली, तिथे कृषीविषयक कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी दिलेलं भरीव
योगदान…त्याबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा सध्या होत असलेला उपयोग….. ही सर्व मांडणी अतिशय मुद्देसूद आणि माहितीपूर्ण
अशी केली आहे. या उत्तम लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! 💐

  • — डॉ किरण चित्रे.
  • निवृत्त दूरदर्शन निर्माती, मुंबई. ह. मु. अमेरिका.

३. Doordarshan…
Useful Information. Good Write up. 👍🙏
— Pro Dr Dyandeo Kasar. Pune.

४. देवेंद्र भुजबळजी,
आज मी “कृषी विकासात दूरदर्शन चा सहभाग” या लेखात आपले शिवाजी फुलसुंदरजी यांनी उत्कृष्ट, अप्रतिम माहिती दिली. त्याच बरोबर डॉ किरण चित्रेजी यांनी विद्याधर गोखले यांच्या वर तयार केलेला उत्कृष्ट माहिती पट पाहिला. दोन्ही एकदम छान

  • — सुरेश गोकाणी. निवृत्त दूरदर्शन निर्माता, मुंबई.

५. मा श्री देवेंद्र भुजबळ साहेब, “न्युज स्टोरी टुडे” यांच्या माध्यमातून , ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या दूरदर्शन च्या लोगो अंतर्गत नुकताच दूरदर्शनच्या पासष्टी पूर्ण प्रित्यर्थ मा श्री निर्माते शिवाजी फुलसुंदर साहेब यांचा लेख वाचला आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी चटकन जाग्या झाल्या. मला आठवतंय की, त्या काळात मोजक्याच लोकांकडे टीव्ही होता.
त्यामुळे मी अभ्यास करून, घरची कामं करुन, बाजूच्या बिल्डिंग मध्ये वरळी बी. डी. डी. चाळीत राहत असताना, बातमी, छायागीत, मराठी- हिंदी चित्रपट तसेच नाटक आणि विनोदी मालिका पाहण्यासाठी, तळ मजल्याबाहेरील खिडकीतून, पाहण्यासाठी प्रथम नंबर लावायचो, तेही १/२ तास अगोदर. शेतकरी संदर्भात जो उल्लेख केला आहे, ते संपल्यावर हे बाकीचे कार्यक्रम लागत असत. पण मुंबईत सुद्धा शेती विषयक- माहितीपर कार्यक्रम आवर्जून पाहिले जात होते. हे विशेष होते.आणि आता,जरी प्रत्येकाच्या घरी टीव्ही आले आहे. तरीही गावात- मुंबईतही आजही शेती विषयी, माहिती, चर्चासत्रे, परिसंवाद पाहिले जात आहेत. माजी दूरदर्शन अधिकारी मा श्री भुजबळ साहेब, आपल्या न्युज स्टोरी टुडे सदरामुळे “जुन्या आठवणींना उजाळा” मिळाला, त्या बद्दल, आपले मनःपूर्वक धन्यवादऽऽऽ !

  • — कवी विलास देवळेकर. आयकर भवन. मुंबई

६. विविध आठवणी जाग्या झाल्या अजूनही रेडीयोवर शेतीविषयक कार्यक्रम असतात शेतकऱ्यांचे प्रश्न उत्तरे असतात मार्गदर्शन असते जर शेतकऱ्याने अधूनिक व नैसर्गिक शेती नियोजन पुर्वक केली तर नक्कीच फायदा होईल काही शेतकरी अतिशय सुंदर फायदेशीर शेती करत आहेत .

  • — सविता काळे.

राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” भाग १६ प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया..

१. खूप छान लेख…
छोट्या गोष्टीतला मोठा बोध…
— नीलिमा खरे. पुणे.

२. Picturesque.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे.

३. Kasa Kay aathavanincha sangrah etka kholvar rujla aahe. wonderful l like it . Mala wachayla khoopch chhan watate.👌👌👏🏼👏🏼
— मीना वाघमारे. अमरावती.

४. किती छान लिहिलंय तुम्ही !
एखादी छोटीशी च घटना पण त्यावरून भावनिक आणि वाचनीय अशी आत्मकथन पर गोष्ट!मी आवर्जून तुमचा लेख वाचते.खरोखरच जडणघडण छान झाली आहे तुमच्या विचारांची !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे.

५. फाऽऽऽऽऽऽर सुंदर लेख आहे ताई,
सारं चित्र मी बघत होते, कोर्ट
पपा मी पाहिले. साक्षात सारे घर.
वाह वा…
— प्रा सुमती पवार. नाशिक.

६. ताई, तुम्ही आतुरतेने वाट पाहता म्हणून मी हा १६ नंबरचा भाग आत्ता वाचला. (आपलं लेखन ज्याला/जिला पाठवले ते ती व्यक्ती कधी वाचून, कधी प्रतिक्रिया देईल याची प्रत्येक लेखकाला अपार उत्सुकता असतेच.असो.)
तुम्ही जी सुरवात केली ती मला माझ्या मनातील प्रतिबिंबासमान भासली. कारण वय ! या वयात खरोखरच असे विचार येतातच येतात. दोन घरं असतील तर हमखास ! मुलांच्या नव्या प्रशस्त घरात राहताना आपल्या कुवतीनुसार घेतलेल्या जुन्या छोट्या घरात गेलं की सगळा पसारा अंगावर येतो. ती भावना तुम्ही अचूकपणे मांडली आहे. तुम्ही वस्तूंबाबत लिहिलं पण मला माझ्या २००७ पासूनच्या साहित्याच्या DTP copies च्या गठ्ठ्यांचं काय करावं, जे ग्रंथ आवडीने, निवॄत्तीनंतर वाचावे म्हणून खरेदी केले ते कुठे कसे निरवावेत‌… असंख्य प्रश्न आणि सुचलेली उत्तरे कारवाईसाठी न पटणारी ! असो.
तुम्ही मात्र त्या वस्तूवरुन एक झकास वळण घेत तुमच्या बालपणीचा एक प्रसंग रंगवून मांडला ज्यामधून तुमची बहीण, तुम्ही, तुमचे वडील, जीजी ही व्यक्तिमत्वे उभी राहिली. तत्वज्ञानाचे बोजड ग्रंथ वाचून जी तत्वे मनात ठसत नाहीत ती अशा प्रसंगांमधून मनावर कोरली जातात. जुन्या वस्तूंबाबत पुरुष काहीसे अलिप्त वा बेफिकीर होऊ शकतात पण स्त्रिया मात्र अत्यंत ‘पझेसिव्ह’ ! “श्रीकॄपेकरुन…” या नावाचे नाटक ब-याच वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिरात पाहिले होते. सुहास जोशी या अभिनेत्री होत्या. माळ्यावरची अवजड भांडी, तत्कालीन कपडे इ. इ. बाबत आठवणींचा पसारा शब्दांकित करीत सुहास जोशींनी दोन तास प्रेक्षकांना बांधून ठेवले होते. एकपात्री नाटक. तुमचा हा भाग वाचून मला ते आठवले‌. अर्थात तुम्ही आत्मकथन योग्य रीतीने बालपणाकडे वळवले हे योग्यच ! तुमच्या लेखनात खूप सराईतपणा आल्याचे जाणवत आहे. कथनाला प्रवाहीपणा येतोय. तो पुढेही असाच सांभाळा.
पुढील लेखनविषयक वाटचालीसाठी शुभेच्छा. ☺️
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई.

७. आयुष्यातला हा किस्सा मला कधीही विसरता येणार नाही. त्यावेळी मी इतकी क्रूर कशी आणि का झाले याचे माझ्याकडे उत्तरच नाही.
तुझा हा लेख वाचून रडू तर आलेच परंतु पपांनी नकळतपणे केलेले संस्कार तू कसे अचूक टिपलेस याचे मला फार कौतूक वाटते.
ती तीन खोल्यातून आमची पळापळ, माझा संतापलेला आणि बिचार्‍या छुंदाचा भेदरलेला चेहरा, त्यात आता यांना कसे आवरू म्हणून जिजीची त्रेधा तिरपिट लेख वाचताना अगदी नजरेसमोर तंतोतंत उभी राहिली.
खूपच प्रभावी लेखन !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका.

८. “घड्याळ “पाहिले आणि वाचलेही.साठ बासष्ट वर्षांपूर्वीच्या आठवणीतल्या भावना पुढे वाचावयास प्रवृत्त करतात.आवडते घड्याळ फुटणे व त्यावर संतापणे ही मानवी सहज क्रिया आहे. वाचावा असा लेख आहे.
— अरुण पुराणिक. पुणे

९. सुंदर आठवणी…. सुंदर विचार
— डॉ. शुभदा कुळकर्णी. जळगाव.

१०. छान लिहिले आहे “घड्याळ,” आख्यान. अगदी आठवणींसह.
— छायाताई मठकर. पुणे.

११. राधिकाताई, आपला जडण घडण भाग १६ वाचला.
अतिशय साधा प्रसंग. प्रत्येक घरात बहिण भावंडांची भांडणे होत असतात. परंतु त्या प्रसंगातून तुम्ही जीवनाचा संदेश दिलात. किंबहुना गीतेचे तत्वज्ञान सहज उलगडलेत. कुठल्याही गोष्टीचा मोह न धरता त्यापासून अलिप्त रहावे कसे व त्यातली सकारात्मकता कशी जपावी हे दाखविलेत.
तसेच आपण अनेक वस्तूंचा संग्रह करतो. त्या गोष्टी आपल्याला टाकवत नाहीत हे खरे आहे. कारण त्या वस्तूंचा मोह नसतो. पण त्या वस्तूबरोबर असलेली आपली आठवण, आपली भावनिक गुंतवणूक. आपल्या लेखनशैलीला शतशः प्रणाम.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव, मुंबई.

१२. साध्या साध्या गोष्टींचं किती यथार्थ वर्णन सोप्या शब्दात सांगितलं आहे. जुन्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावणे सर्वांचीच डोकेदुखी असते आणि अशी निरुपयोगी वस्तू तुटली फुटली आणि गहाळ झाली तरी हळहळ आणि राग सहाजिकच उद्भवतात. पण त्यांचं अगदी भावनिक वर्णन केलं‌ आहे. खूप छान.
— प्रमोद शृंगारपुरे, पुणे.

१३. अगदी साध्या विषयावर तू सहज, सुंदर, ओघवत्या भाषेत लिहितेस. वाचायला आवडते.
— सुमन शृंगारपुरे. पुणे.

१४. आपण खरंच किती गोष्टी गरज, आवडलं म्हणून तर कधी हौस म्हणून जमवून ठेवतो. आम्ही नव्या घरात येण्यापूर्वी एक खोलीभर वस्तू कुणाकुणाला देऊन टाकल्या.
प्रत्येक वस्तू जीवापाड जपली होती,काहींवर प्रेम केलं होतं. असंच देऊन टाकायला मन तयार नव्हतं, केलं होतं. ह्या घरातही अशा वस्तू आहेत की मी त्यांचा वापर करेन की नाही ह्याची मलाच शंका आहे. पण अनेक आठवणी त्यामागे आहेत.जीव गुंतला आहे. असं प्रत्येकाचं होत असेल, नाही का? ताईचं घड्याळ छुंदाकडून चुकून पडलं आणि ताईला राग आला हे स्वाभाविक होतं. तेही बक्षीस म्हणून मिळालेलं. त्या लहान वयात तर त्यात सगळ्या भावना गुंतल्या असतील तिच्या. अभिमान वाटत असेल. बरं, धाकटीने मुद्दाम पाडलं नव्हतंच. पण त्यावर पप्पानी सांगितलं ते मात्र अगदी खरं!
छानच, ह्याहून नवं चांगलं मिळेल हा विचारच खूप दिलासादायक आहे.
आई – वडिलांच्या अशा छोट्या सांगण्यातून तर आपली जडण – घडण होत असते.
घरातील गणपती उत्सवाचे वर्णन छान केलं आहेस. साधी, सुंदर आरास, गणेशाची सुंदर मूर्ती असायची. उत्सहात सगळे साजरे होत असे. आरती, उकडीच्या मोद कांचा नैवेद्य — खरंच महाराष्ट्रातील हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. आज जगभर साजरा केला जातोय. तुझ्या लेखामुळे लहानपणीचा, सासरी आल्यावर घरातला आणि इतर सर्व ठिकाणच्या गणपती
साजरा होत असे किंवा होतो त्याच्या आठवणी दाटून आल्या.
गणपती बाप्पा मोरया! 🙏(भाग १४)
— अनुपमा आंबर्डेकर.

माधुरी ताम्हणे लिखित, ‘माध्यम पन्नाशी’ वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. खूप छान. Multitasking बद्दल लिहिलय ते अगदीच पटलं

  • — डॉक्टर शलाका गोरे. मुलुंड, मुंबई.

२. ‘माध्यम पन्नाशी’ खूप छान अगदी खिळवून ठेवणारी लेखनशैली. ‘झलक’ खूप सुंदर.
— अरुणा गर्जे.नांदेड.

३. show must go on हेच सत्य. माधुरी ताम्हणे यांचा हा लेख वाचताना हेच मनात आले. सुंदर लेख.
— राधिका भांडारकर. पुणे

४. तुमचं ओघवत्या भाषेतलं लिखाण म्हणजे प्रत्यक्ष संवाद साधत आहात असंच वाटतंय.
— अजित महाडकर. ठाणे.

५. इतकं स्वच्छ आठवतंय तुम्हाला? खरंच कमाल. गोड गिफ्ट 😃
चांगला झालाय आजही आणि आकाशवाणी कामाचे बरकावे कळताहेत त्यातून 👍🏻
— आरती कदम. फिचर एडिटर लोकसत्ता, मुंबई.

“देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड”…या वृत्तावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. वा वा छान! परत एकदा अभिनंदन. जोशी बेडेकर कॅालेज फार जुनं आणि प्रसिद्ध आहे. त्या कॅालेजचे अॅडव्हायझर म्हणजे मानाची पोस्ट आहे. तुम्ही तुमचे qualification परत एकदा prove केल्या बद्दल अभिमान वाटत असेल ना ! परत एकदा अभिनंदन.

  • — प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर.
    २. नमस्कार सर…
    माध्यम जगतातील तज्ञ म्हणून आपली फेरनिवड झाल्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा.. संबंधित संस्थेने आपणावर टाकलेला विश्वास आपण आपल्या कार्यकुशलतेने अत्युच्च शिखरावर नेणार यात शंकाच नाही.. पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी आपणांस पुन्हा भरभरुन शुभेच्छा..
  • — रवींद्र घोगे, सिन्नर.

  • ३. हार्दिक अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर. आपली पुनश्च निवड होणे, ही आपल्याप्रमाणेच आपल्या वाचकांसाठी, आमच्यासारख्या स्नेहीजनांसाठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी वर्गाला पत्रकारिता व लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्याची स्फूर्ती प्राप्त होईल, ह्याची खात्री आहेच. आपल्या ह्या नवीन कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
  • — मृदुला राजे. जमशेदपूर
  • ४. नमस्कार सर.आपली मराठी अभ्यासमंडळावर नियुक्ती ही अभिमानास्पद बाब आहे.माझ्या साहित्यविषयक काही शंका आहेत.आपण ज्या महाविद्यालयात मराठी अभ्यासमंडळावर आहात, त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखांचा(नाव व) वाटसॅप नंबर
    कळवले तर मी त्यांना फोन करून वेळोवेळी शंका विचारील. त्यांनाही माझी ओळख (आपला स्नेही) सांगणे. मी पुढील आठवडय़ात भारतात परत येत आहे.
    — प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ. 🙏🏻

५. देवेंद्र जी,
आपली ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या बोर्ड ऑफ स्टडीज वर फेर निवड करण्यात आली या बद्दल हार्दिक शुभेच्छा.

  • — सुरेश गोकाणी. निवृत्त दूरदर्शन निर्माता

  • ६. माध्यम जगतातील तज्ञ आपल्या झालेल्या फेरनिवडीबद्दल देवेंद्रजी आपले मनापासून खूप हार्दिक अभिनंदन ! तसेच, आपल्या आठ पुस्तकांच्या प्रकाशनासाठी सुध्दा आपले खूप हार्दिक अभिनंदन! न्यूजस्टोरीटुडे घ्या ग्रुपवर मेसेज टाईप केला पण, सेंडचे बटन न मिळाल्याने मेसेज पाठविता आला नाही. म्हणून इथे पाठविला.👌🙏🏻
  • — मधुकर नीलेगवकर. पुणे

“आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” या मी (तर देवेंद्र भुजबळ) यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. भुजबळसर खूप सुंदर लेख. आपल्या लेखाला जोड म्हणून या ठिकाणाचा व्हिडिओ पाठवत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या निसर्गोपचार आश्रमाचा लाभ घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
— प्रा प्रतिभा सराफ. मुंबई.

२. नमस्कार सर, ज्याप्रमाणे निसर्ग आपल्या खूप शिकवतो, तसेच उपचारही करत… खूप छान, महत्त्वपूर्ण, उपयोगी आणि संपूर्ण माहित दिल्याबद्दल… धन्यवाद 🙏

  • — आश्लेषा गान.सातारा

३. साहेब प्रथम मानाचा मुजरा अप्रतिम बातमी पत्र.

  • — डॉ के आर माळवे. मुंबई

  • ४. देवेंद्र साहेब उरुळी कांचन येथील निसर्गोपचार पद्धतीची इथंभुथ माहिती आटोपशीर शब्दात परिवाराच्या सदस्यांना देऊन आपण जागरूक रहायला हवे असे सुचवले आहे. याच बरोबर जर का अधिक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक देता आला असता तर सोने पे सुहागा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या जवळ असताना मी मात्र वेड्यासारखा इकडे तिकडे शोधत होतो म्हणतात ना काखेला कळसा आणि गावाला वळसा. असो उद्या नवा दिवस नवा अध्याय. शुभ रात्री

अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आश्रमात काही दिवस राहिलो म्हणजे कायमचा कायापालट होईल, अशी अपेक्षा करू नये. तर महत्वाचे आहे ते आश्रमात पाळलेल्या जीवनशैलीचा तसेच व्यक्तीनुसार दिलेल्या सूचनांचा अंगीकार कायम स्वरुपी केला पाहिजे. हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे. असा प्रेमाचा इशाराही दिला आहे.

  • — प्रकाश पळशीकर. पुणे

५. ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ छान माहितीपूर्ण लेख.

  • — अरुणा गर्जे. नांदेड.

इतर मजकुरावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. ‘जेष्ठ नागरिक महामंडळ: माझ्या अपेक्षा’ खूप छान, अभ्यासपूर्ण विचार. 🙏💐

‘माझी जडणघडण’ खूप भावस्पर्शी मनाला भावणारे लेखन.

‘विलेक्शन फुटाफुटी’ वास्तववादी आणि खूप छान लयबद्ध रचना.
— अरुणा गर्जे. नांदेड

२. Prime Minister shree Narendra Modijee ‘s Birthday 17th September. Very good wwriteup on his birthday. Appreciated.!!

  • — Sharad Moghe. Retd. DD Engineer, Mumbai

३. श्री सुधाकर तोरणे यांनी लिहिलेल्या “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” या पुस्तकाच्या परीक्षणावर पुढील प्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

१. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिल्याबद्दल श्री सुधाकर तोरणे यांचे धन्यवाद.
पुस्तकातील वर्णन श्रीकृष्ण चरित्र आहे की महाभारतकारांनी वर्णन केलेल्या राजकीय पटलावरील घटनांचा व्युहात्मक विचार व्यक्त केलेला आहे ते समजून घ्यायला आवडेल.
श्रीकृष्ण, श्रीराम अशा व्यक्तिमत्त्वांना धार्मिक, दैवी देणगी असलेल्या असे पहायचे टाळून, राज्य पद न घेता, जनसामान्यात राहून त्यांच्या गरजा, समस्या, अडचणी समजून घेतल्या. असंघटित शक्ती एकत्र करून मोठ्या, ऐश्वर्यवान राजसत्ता आपापल्यात भांडून विनाश घडवतात. यावर विश्वास दांडेकर यांनी प्रकाश टाकला आहे. तो नक्कीच विचार करायला लावणारा असेल. पुस्तक मागवायचे असेल तर कुठे संपर्क साधावा यावर प्रकाश टाकला जावा.

  • — विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे

२. पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढवली आहे तोरणे सर. दांडेकरांच्या ‘धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्र’ मधील कृष्णाचं वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं रेखाटन निश्चितच आकर्षक असावं. महाभारतावरच्या अनेक लेखकांच्या रचनांच्या संदर्भातही ‘धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्र’ मध्ये भाष्य असल्याचं तुम्ही निदर्शनास आणून दिले आहे, ते वाचणं ही ज्ञानप्रद असेल.
तुमचे मनापासून आभार. एक चांगल्या ग्रंथाचं छानसं समीक्षण बघून, आपल्या समीक्षण-कौशल्याचं कौतुक करावसं वाटतं. आपणास खूप धन्यवाद.🙏
— डॉ.विनायक भावसार. इंदूर.

३. नेहमीसारखंच उत्तम परीक्षण….१० दिवसांच्या आनंददायी वास्तव्यानंतर परतून गेलेल्या बाप्पाच्या वियोगात, उदास झालेल्या मनाला हे वाचून पुन्हा छान वेगळ्या वाटेवर घेऊन गेलात सुधाकाका….. खूप छान
— सौ.रेखा भावसार. मंडी (हि.प्र.)

४. श्रीमती राधा गर्दै यांनी ब्लास्फेमी या पुस्तकाबद्दल छान लिहीले आहे मी हे पुस्तक यापूर्वीच दोन वेळा वाचलं आहे ब्लास्फेमी म्हणजे ईश्वराबद्दल निंदाजनक व्यक्तव्य करणे असा अर्थ आहे पीर हा जर ईश्वर असेल तर त्यानी केलेली कृत्ये फारच भयानक आहेत एक प्रकारची ही विकृतीच म्हणायला हवी. राधाताईने अगदी छान समर्पक लिहीले आहे. अशाच प्रवृत्तीवर अजून अनेक पुस्तके आहेत दि लास्ट लेडी – नॉट विदाऊट माय डॉक्टर …….. अन बरीच.

  • — सुनील चिटणीस. पनवेल.

५. बहुगुणी पेरू हा श्री विनायक बारी यांचा छोटेखानी लेख वाचला याच फळावर U Tube war असलेल्या माहिती पेक्षा अधिक विस्तृत प्रमाणात माहिती प्राप्त झाली. मला एक माहिती आहे ती आपल्या परिवारातील सदस्यांनाही कळावी म्हणून लिहितोय ज्यांना किडनी स्टोन अथवा तत्सम समस्या आहे त्यांनी पेरू काय कोणतेही फळ किंवा हिरवी, लाल मिरची असो किँवा बी असणारे फल भाजी हे नेहमीच बी काढून खाणे हितकारक आहे बी मूत्र विसर्जन करण्यात त्रास होणार नाही.

  • — प्रकाश पळशीकर. पुणे

  • — टीम एन एस टी. ☎️9869484800
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. राधिका भांडारकरचा जडणघडणा७ वा भाग वाचला.कांही प्रसंग व घटना मनाला चटका लावून गेल्या मला वाटत बालपणात अशा अनेक छोट्या गेाष्टी प्रसंग मनावर संस्कार करतात.त्याची जाणीव आपल्याला मोठेपणी होते .त्या सर्व आठवणी तुला नीट आठवतात .त्या आठवणीचा गोफ तू इतका सुरेख गुंफलास कि मनोरंजन तर होतेच पण त्यातून बोधही मिळतो .असेच उत्तम साहित्य तुझ्या हातून घडो ही शुभेच्छा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन