नमस्कार मंडळी.
हवाहवासा श्रावण संपला. पण आता वर्षभर प्रतिक्षा करायला लावणाऱ्या श्री गणेशाचे आगमन झाले आहे. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
आपल्या पोर्टलच्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. या चॅनलची लिंक आपण आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध केली होती. या विषयी अनेक वाचक-प्रेक्षकांच्या प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१
सौ अलकाताई भुजबळ यांनी कांक्षा जकाते यांची ’न्यूरो सायन्स – अडचणींवर मात करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान’यावर घेतलेली मुलाखत खूप माहितीपूर्ण आहे. दिवसेंदिवस भारतातील जीवनमान अतिशय गतिशील होत आहे. तसेच कुटुंब पद्धतीत पूर्वी मिळणारा मानसिक आधार व आत्मविश्वास वाढविणाऱ्या व्यक्ती व प्रसंग सध्या खूपच कमी होत चालले आहेत. धावपळीच्या जीवनात शारीरिक कष्टाबरोबर मानसिकदृष्ट्याही अनेक व्यक्ती थकून जातात. मुले, पालक आणि व्यावसायिक मंडळींना येणाऱ्या तणावामुळे ते आत्मविश्वास गमावून बसतात. त्यावर न्यूरो सायन्स या नवीन तंत्रज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल. शाळेतील मुलांच्या योग्यवेळी शाबासकीने पाठ थोपटून त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे ते नक्कीच यशस्वी होतात.या मुलाखतीत अलकाताईंनी कांक्षा यांना योग्य प्रश्न विचारून अनेक अडचणीवर मात करण्याच्या उपायांसाठी चांगलेच बोलते केले. विशेष म्हणजे या मुलाखतीत त्यांच्या काही व्यक्तींनी झालेल्या मानसिक व शारीरिक फायद्याचा अनुभव देखील सांगितला आहे. कांक्षा यांच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अलकाताईंच्या मुलाखती निश्चितच ऐकण्यासारख्या असतात.
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका.
२
अलकाताईंना माझा
सदर प्रणाम.
अतिशय उत्साही, प्रेरणादायी, सतत काही न काहीतरी सकारात्मक कार्य करण्यास उत्सुक !खरेच खूप कौतुकास्पद नाते संबंध दृढ करण्यासाठी नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी इतकी तरुण पिढी.. इंजिनियर एम बी ए झाल्यानंतर न्यूरो सायन्स सारख्या विषयात रस घेते आणि तिला अलकाताई बोलते करतात हे बघून खूप आनंद झाला. त्यांचे हे पॉडकास्ट फार उपयोगी ठरत आहेत. अभिनंदन.
— स्वाती वर्तक. मुंबई
३
न्यूरो सायन्स हे अडचणीवर मात करण्याचं नवीन तंत्रज्ञान. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर अलकाताईंनी घेतलेली मुलाखत खरोखरच खूप आवडली. विषय अवघड जरी असला तरी तो अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. अलकाताईनी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून विषयाला चांगली चालना दिली आहे. अलकाताईंचं मनापासून अभिनंदन. ज्यांची मुलाखत घेतली आहे . जर एखादा मनोरुग्ण असेल तर तो बदलण्याची ताकद न्यूरो सायन्समध्ये आहे. माणूस कौन्सिलिंग करून बदलता येतो, हे सिद्ध होत आहे. ही एक आनंदाची बाब आहे.
— मारुती विश्वासराव. नवी मुंबई
४
न्युरो सायन्सविषयी मुलाखत माहितीपूर्ण वाटली.👍🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, हल्ली मुक्काम इंग्लंड.
आपण दर बुधवारी “श्रेष्ठ हिंदी साहित्यिक” ही प्रा डॉ एम डी इंगोले यांची लेखमाला सुरु केली आहे.या लेख मालेला छान प्रतिसाद मिळत आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
सुमित्रानंदन पंत उत्तम साहित्यिक लेख.
मी त्यांना प्रत्यक्ष भेंटलो असून कविताही ऐकल्या आहेत.
— डॉ गोविंद गुंठे.
निवृत्त दूरदर्शन संचालक तथा साहित्यिक, नवी दिल्ली.
२
सुमित्रानंदन पंत श्रेष्ठ कवी होते. त्यांची उत्तम माहिती दिली आहे. त्यांना कॉलेज मध्ये वाचलेले होते त्याची उजळणी झाली.
आभार प्रा इंगोलेजी.
— स्वाती वर्तक. मुंबई
३
“सुमित्रानंद पंत” हा लेख चांगला आहे.
— गज आणण म्हात्रे. नवी मुंबई.
४
श्रेष्ठ हिंदी साहित्यिक…
अतिशय सुंदर उपक्रम आहे, हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !! मला आवड आहे ! निश्चित पाहीन व वाचन करेन.
— नरेंद्र अष्टेकर.
निवृत्त महानगर पालिका उपायुक्त, छ. संभाजीनगर.
५
“श्रेष्ठ हिंदी साहित्यिक”
वा ! खूप छान उपक्रम… धन्यवाद सर.
— उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर.
सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या, “अलकाताई : एक पाऊल पुढे” या लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
अलकाताई,
तुमचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केले आहे. जवळ रहायला असतो, तर वारंवार भेटतां आले असते. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹😍
— अर्चना ताम्हणे. डोंबिवली
२
अप्रतिम लेख. अलकाताईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख इतक्या सुंदर रितीने करून दिलीय ना की … लाजवाब. लेखिका रश्मी यांना 🫡🫡🫡आणि आपल्याला माझ्यातर्फे always 🥰🥰🥰 👍👍👍अशाच पुढे जात रहा.. great
– नीता देशपांडे. पुणे
३
निर्माती सौ.अलकाताई भुजबळ यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नोंद व्हावी येवढे महान आहे. 💐🙏👍
— कवी, लेखक गोविंद पाटील. जळगाव
४
आपल्या सौ.अलकाताईंचा सर्वांना अभिमान वाटतो आणि मलाही. कारण आम्ही त्यांना आमच्या मोठ्या बहिणीच्या यादीत ठेवलेलं आहे. आता तर BSNL & MTNL Mumbai एकत्रित झाले आहे.
आपला लाडका भाऊ
— अशोकभाई बोरकर.
सेवानिवृत्त BSNL अधिकारी अहमदाबाद, गुजरात.
५
अलकाताई एक पाऊल पुढे.. रश्मी हेडे ताईंचा सुंदर लेख वाचुन माझ्यासारख्या अनेकजणींना नक्कीच प्रेरणा मिळेल. अष्टपैलू व्यक्तीमत्व असूनही तितक्याच उत्साही आणि समाजसेवेत सतत कार्यरत असतात. इतके सगळे कसे जमू शकते एकाच व्यक्तीला ?याचे खरंच आश्चर्य वाटते. त्रिवार सलाम🙏.
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
६
नमस्कार.
रश्मी हेडे यांचा लेख वाचून एकच आकलन झाले ते म्हणजे ‘एक चतुरस्र व्यक्तीमत्व म्हणजे अलकाताई !’ अलकाताई, प्रत्येक नवीन पायवाटेवर प्रथम आपलेच एकेक पाऊल पुढे टाकलेले असेल यात शंकाच नाही.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.
७
एक पाऊल पुढे…
उत्तम.
— रवी वाडकर. नवी मुंबई.
८
रश्मी हेडे यांचा लेख सर्वार्थाने उचित आहे. पोर्टलची वाटचाल अभिमानास्पद आहे.👍🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, हल्ली मुक्काम इंग्लंड.
९
सर्व गुण संपन्न अलकाताई.
— प्रा अनिसा शेख. दौंड
अन्य लेखांवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
१
श्री कासार यांनी दाविले ते कृष्णाचे जीवन दर्शन अनुपम आहे.. आवडले
डॉ पांढरीपांडे यांचा लेख विचार करण्या योग्य…स्वातंत्र्य म्हणजे खरे काय …हेच कळत नाही अजून ..दुर्दैव…स्वातंत्र्य आणि उच्छृंखलता
यातील रेषा अतिशय धूसर असते ती ओळखता आली पाहिजे
डॉ आसावरी वरील लेख बघूनच मला खूप आनंद झाला.. माझी मैत्रीण आहे ती.. तिचे अनेक गुण यात आलेच नाहीत असे वाटावे इतकी गुणी आहे ती.. चित्रा ताई यांचे आभार.. खूप छान ओळख करून दिली आहे .
सुनीताजी आणि शोभाजी यांच्या कविता चांगल्या आहेत.
राधिकाताईंचा पारोळ्याचा फाफडा, कानबाई, रोट सारे मजेशीर आहे.
प्रणिताजींना शुभेछा व अभिनंदन.
अनुपमाजींची श्रावण कविता छान हलकी फुलकी आहे आवडली.
शिकागोला माऊलीचा जयघोष ऐकून, सर्व फोटो बघून अभिमानाने ऊर दाटून आला
असामान्य प्रतिभेचे धनी महाकवी कर्डक यांची माहिती खूप छान ..आवडली
— स्वाती वर्तक. मुंबई
२
“भारूडाचे गारूड” हा अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख. धार्मिक अधिष्ठान असलेला आणि समाज प्रबोधन करणारे ते अनोखे महाराष्ट्रीयन माध्यम आहे.
“शोले” चित्रपट हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अनुभव आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, हल्ली मुक्काम इंग्लंड.
३
पावसाच्या साऱ्या कविता चिंब करणाऱ्या आहेत.
— गोविंद पाटील सर, जळगाव
४
भुजबळ साहेब, आपण २१ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना बद्दल आपल्या विशेष लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनांची अजिबात माहिती नाही. कित्येक ज्येष्ठ नागरिकांनी तर अद्याप ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारे ओळखपत्र देखील काढले नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक छळ होते. हे मात्र सत्य वस्तुस्थिती आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांना जन्म देऊन नेहमीच दोन हाताने त्यांना देण्याची भूमिका पार पडली आहे. परंतु आज अनेक आई-वडिलांना आपल्या मुलांसमोर आरोग्य विषयी हात पसरावे लागतात. हे ऐकून खूप वाईट वाटते. वास्तविक पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी २००७ मध्ये केलेल्या कायद्यामध्ये मुला मुलींची आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. ते टाळू शकत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीला सर्वच वाटेकरी होतात. तेव्हा ते जिवंतपणे असताना देखील त्यांची सांभाळण्याची जबाबदारी आहे. आई-वडिलांनी तर आपल्या असलेल्या आई-वडिलांचे मृत्युपत्र बनवावे. जोपर्यंत आई-वडील आहेत तोपर्यंत मुलांना आई-वडिलांची संपत्ती मिळणार नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र ती संपत्ती मुलांचीच असेल. हे स्पष्ट आई-वडिलांनी आपल्या मुलांना आज सांगण्याची गरज आहे.
आपला लेख वाचल्यानंतर अनेक गोष्टी आठवतात. संघटनेमध्ये काम करताना अनेक मुलं आपल्या आई-वडिलांना सांभाळीत नाही. अशा अनेक घटना आज आपल्याला समाजात दिसतात. या विरुद्ध जनजागृती करणे आपल्यासारख्या लेखकांच्या हातात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष लेखाबद्दल आपले गोदी कामगारांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन.
मारुती विश्वासराव. नवी मुंबई
५
कल्याण येथील रानभाज्यान्च्या प्रदर्शनाला यायला मिळाले असते तर ? असे वाटतेय.. खूप नावीन्यपूर्ण पदार्थ, भाज्या, फळे त्यांचे पदार्थ पहायला मिळाले असते. बऱ्याच रान भाज्या दुर्मिळ आणि माहिती नसलेल्याही असतात. मजा आली असेल ना ?
स्वाती दामले यांची श्रावणमास ही कविता सुरेख आहे.👌🏻👍🏻
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
माझी जडणघडण भाग ६२ अभिप्राय.
(खानदेशी संस्कृती)
१
सुंदर. मनाला आनंद देत समृद्ध करणारं आपले सण, व्रत आणि आपले लेखन देखील 🙏
— अस्मिता पंडीत. पालघर
२
राधिकाताई,
तुमच्या अमळनेरच्या आठवणी खरंच खूप मौल्यवान खजिना आहे. काही नाती बोलकी तर काही अबोली.. पण त्यांच्या दरवळणाऱ्या गंधात तुमच्या आठवणी किती छान एकरूप होऊन गेल्या आहेत!
आयुष्याच्या काही गोष्टी मुळीच छोट्या नसतात. नकळत त्या तुम्हाला घडवत असतात.आयुष्याच्याली ती कधीही न सुकणारी हिरवळ असते. खूप खूप खूप आवडली ही वाक्यं..
तुम्ही एकत्र साजऱ्या केलेल्या सणांची गंमत आम्हाला ही मजा देउन गेली…
खानदेशी गाणी आणि खाणी दोघांची न्यारी रंगत वाचायला मिळाली..
पुढच्या भागाची प्रतिक्षा.
— मानसी म्हसकर. वडोदरा
३
आठवणींनी तुमचे मन भरुन आले, राधिकाताई.
सर्व वाचून माझे पण मन भरुन आले. छान लिहिल्या आहेत आठवणी.👌👌
— छायाताई मठकर. पुणे
४
खूपच छान लिहीले आहेस.
साधे प्रसंग पण त्याचे महत्व किती अपार.
तुझी लिहीण्याची हातोटी इतकी सरसर आहे की सहज लिहील्यासारखे वाटते.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
५
एकत्र कुटुंबाबद्दलची आस्था, त्यातील प्रेमाचे धागे त्याचा अनुभव, छोट्याशा प्रवासातील आठवणी त्याचा शहरी प्रवासाशी असलेला फरक, सदरूमामु सारख्या टांगेवाल्यांची आठवण, खान्देशातील रखरखीत उन्हाळा, त्यातील शेती या सर्व बाबींची खुपच सुरेख सांगड या लेखात घातली आहे. विशेष महत्वाचे म्हणजे खान्देशात होणाऱ्या सणवाराचे वर्णन आखाजी, पोळा,खास करुन कानबाई रोट यासंबधीची माहिती अहिराणी गाण्यासह सविस्तरपणे मांडली आहे.खुपच छान.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर
६
👍👌🏻👌🏻👌🏻खानदेशी
संकृती, तिथले सणवार, तिथल्या लोकांचे श्रद्धास्थान या सगळ्या गोष्टींचा यथायोग्य परामर्ष घेतला आहे. वाचायला मजा आली. 🌹
— सुमन शृंगारपुरे. पुणे
७
खानदेशी संस्कृतीवरचा हा लेख वाचताना फारच मजा वाटली.शेती मातीच्या या प्रांतातील कानबाई रानबाई या देवतांविषयी नवी माहिती मिळाली. शहरी संस्कृतीत वाढलेल्या तुला अंमळनेरस्थित सासर लाभल्यामुळे तुझ्या व्यक्तित्वाला हे वेगळेच पैलू पडलेले या लेखातून प्रकर्षाने मला जाणवले.
अप्रतीम लेखनशैली.
— अरुणा मुल्हेरकर, अमेरिका
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खानदेशी सण त्याच्या मधली सहजपणे नाते जोडणारी ही प्रेमळ विण यथार्थपणे मांडलेली आहे राधिका ताईंनी सासरी असलेले सणवार कानबाई बैलपोळा हे सगळे अचूक मांडलेले आहेत मुक्या प्राण्या प्रती असलेली घरातल्या लोकांची आत्मीयता त्यांच्या कष्टाची जाणीव आणि त्यांना दिलेला मान हे मनाला विशेष भावते ते सगळं जवळून बघून आठवणी मांडल्या आणि अगदी यथार्थ वर्णन केलेल आहे खानदेशी लोकांचा साधेपणा प्रेमळ पणा आणि आपल्या उपकार करत्या विषय असलेली जाणीव आणि त्यांनाही वाटणारी आत्मीयता लिखाणातून जाणवते गाणी सुद्धा नवीनच आहेत आपल्या सगळ्यांना खानदेशी सणांची माहिती होते