Sunday, March 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या पंधरवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

आपल्या कल्पना, सूचना असतील तर त्या ही अवश्य कळवा. त्यांचे स्वागतच आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक

अप्रतिम हंपी सफर आणि ईतर प्रबोधनकारी लेख 👌

जीवन आणि रंगाकार सहसंबंध म्हणजे माती सांगे कुंभाराला का तुडविशी मज पायी…देश आणि देशातील माणसं विविध रंग रूप आकाराची व सहजप्रवृत्तीच्या सगुण निर्गुण निराकार निर्मळ मनाचे बालपण अनुभवताना वास्तव लोभी अप्रमाणिक मत्सर यांनी प्रदुषित मनोवृत्तीचा वाढत्या वयाबरोबर मनावर जी जखम व्रण रेखित होतात त्यांच्या गहिर्या सोज्वळ विविध रंगछटा आकार ललित कलाउपासक कलावंत साहित्यिक संगीत गीत ई, दृकश्राव्य आपल्या माध्यमातून सकारात्मक अथवा नकारात्मक प्रतिकात्मकतेने अभिव्यक्त होतो. लेख आणि डाॅ.गजानन शेपाळ सरांचे उल्लेखनीय कार्य, हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 🌺🙏
– सुनील नेत्रगावकर. कला शिक्षक, नांदेड

वर्षा भाबळ यांची “म्हाळ” ही चांगली मालवणी कविता.
– श्रीकृष्ण बेडेकर. ज्येष्ठ संपादक, इंदूर

डाॅ.मीना बर्दापूरकर यांची “मी एक शून्य”
ही कविता मनाला स्पर्शून गेली.
“तुझ्या असण्यातच सामावलं होतं माझं अख्ख विश्व”
शब्द अगदी मन कोरुन गेले.
कविता काहीशी नकारात्मक असली तरी वास्तविक भावनेची..
– राधिका भांडारकर, अमेरिका

“सुवर्ण सह्याद्री”
या लेखाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे…
माजी दूरदर्शन निर्माते व निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ साहेब आपल्या या सुवर्ण प्रवासाला
शतश: प्रणाम. पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
– सौ.स्वाती कुलकर्णी, सौ.निशा बारस्कर आणि सर्वश्री नामदेव चव्हाण, सुरेश महाडिक, भिवाजी, विश्वनाथ मोरे, लाडू पवार, वसंत गुंदेकर, विलास कुडके.

अरुणाताई मुल्हेरकर यांची नवरंग ही कविता फारच सुरेख. नवरात्री नऊ देवी आणि नऊरंगांचे महत्व, अर्थ उलगडणारी समर्पक कविता. ताईंची भाषेवरची पकडही जाणवते. ऊत्कृष्ट शब्दभांडार आहे ताईंजवळ.
– राधिका भांडारकर. अमेरिका

“मी एक शून्य” कविता मनापासून भावली.
– प्रकाश पळशीकर. पुणे

“मराठी शुद्ध लेखन” सुंदर लेख 👌🏻👌🏻
– सौ.मनिषा पाटील. केरळ.

अतिशय उत्तम कोश. आणि तो दिल्याबद्दल धन्यवाद.
– अरविंद गोखले. संपादक, लेखक. पुणे

नमस्कार सर.
“मराठी शुद्ध लेखन”.. माझ्या साठी खूप उपयोगी पडेल. धन्यवाद.
– स्वाती शार्दुल. औरंगाबाद.

तुम्हाला तुषार गांधी सह संवाद साधता आला ..वाह.. छान.
बाकी आहे ..गझल उत्तम जमली आहे..अभिनंदन.
शिकागोच्या सुजाता यांच्याबद्दल वाचून अभिमान वाटला. उत्तम व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
फारूक शेख ला खरोखर मानाचा मुजरा ..असे अकस्मात कुठूनतरी देवदूत येतात आणि मुंबईचे नाव उज्वल करतात. आनंद होतो .
कीर्ति कॉलेज ने सागरी किनाऱ्यावर केलेले काम अतिशय स्तुत्य ..अशा मुलांची फळी वाढवणे अतिशय आवश्यक.9
म्हाळ.. कविता छान
विसुभाऊंचा लेख आवडला..पाडाच दत्तक घेऊन त्यासाठी झटणारे रावसाहेब वंदनीय.
मराठी शुद्ध लेखन …हा लेख अतिशय उपयोगी आहे. सांभाळून ठेवायला हवा. देहांत ..देहान्त.. त्यातील भेद वगैरे सारे फार उपयुक्त आहे.

भाऊराव पाटील यांच्यासारखे कर्मयोगी आता होणे नाही. ही पूर्वीची पिढी जितकी प्रामाणिकपणे, निष्ठेने समाजसेवेसाठी झटली तसे आता दिसणे दुर्मिळ.
दत्तात्रय जाधवांसारखे लोक प्रेरणास्पद असतात. त्यांची माहिती दिल्याबद्दल आनंद.
ओठावरलं गाणं आणि ..
“मी एक शून्य”..कविता छान.
– स्वाती वर्तक. मुंबई.

“शिकागोच्या सुजाता” हा लेख वाचून सुजाताताईंच्या लेखनातील त्यांच्या कौशल्याची विविधता खरोखर कौतुकास्पद आहे… त्यांच्या हातून सरस्वतीची सदैव सेवा घडो…
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई

“नवदुर्गा”
नवरात्र निमित्ताने एक नवीन, चांगला उपक्रम घेऊन समाज प्रबोधन, कार्य हातात घेऊन चांगली माहिती दिली आहे . धन्यवाद
– विलास प्रधान. मुंबई

नवरात्रोत्सवात आपल्या पोर्टलवर नवदुर्गांची खुप छान माहिती वाचायला मिळते…
आजच्या भागातील सौ. जोत्स्ना ताई कासार यांचा परिचय मनाला स्पर्शून गेला.. कच न खाता परिस्थितीवर मात करून त्यांनी आज शैक्षणिक क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.. सौ. जोत्स्नाताई कासार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा… 💐🙏
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.

डाॅ. शुभांगी पारकर यांचे आत्महत्तेबद्दल विविध प्रकारचे संशोधन वाचले. एक गोष्ट निश्चित आहे की ती वेळ मारुन नेली तर बरेच काही टळले जाईल. बालहत्या., स्त्री हत्या आणि प्रौढांच्या आत्महत्या केवळ विचार बदलुन वाचविता येतील असे वाटते. ज्यांनी परत परत तसा प्रयत्न केला तर त्यांच्या वर पाळत ठेवता येईल. किंवा इस्पितळात ठेवता येईल. Sound mind in a sound body.
पुजा रोहीत कोल्हे यांनी शेती करुन एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे… या दांपत्याचे अभिनंदन…

वर्षा भाबल यांची नवशारदियनी लोकभाषेत खुपच गोड वाटली. शारदा, देवी, सरस्वती ह्या तिन्ही देव्या एकच आहेत व स्त्री शक्ती च रुप आहे, हे स्पष्ट केल आहे…. धन्यवाद.
– सुधाकर धारव. यवतमाळ

नमस्कार.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे ची सर्व सदरे सुंदर आहेत. दिं. २६ ते ३० पर्यंत ची सर्व सदरे सुंदर आहेत.
डॉ.राणी खेडीकर यांच्या चारीही नवदुर्गा अतिशय वाचनीय, प्रेरणा दाई आहेत.आजची शमिभा तर खुपचं भावूक करणारी व प्रेरणादाई आहे.
“हितगुज” हे आशा कुलकर्णी यांचे आत्महत्येवरील सदर सुन्न करणारे, विचार करायला लावणारे होते. चारही भाग अतिशय अभ्यासपूर्ण होते .

“महानुभावांचे योगदान” हे विजया ताईंचे सदर तर नेहमीच सुंदर, वाचनीय असते.
सर्व कविताही खूप सुंदर आहेत.
साऱ्यांसाठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
– आशा दळवी.  फलटण, सातारा.

भुजबळजी, सुवर्ण सह्याद्री च्या सुवर्णमयी आठवणींबरोबरचं तुमच्या दूरदर्शनसह मावजच्या मोरपंखी आठवणींना तुम्ही दिलेला उजाळा प्रेरणादायी बरोबरचं अनुकरणीय आहे, असेच सदैव कार्यरत राहून यशस्वी, आनंदी रहा हीच यानिमित्ताने मनःपूर्वक सदिच्छा.💐
– वीणा गावडे. मुंबई.

सर, आपण आपल्या संपूर्ण कारकीर्दिच्या वाटचालीचा क्रम सादर केला. तो वाचून प्रसन्न वाटले.सर, मी प्रकाशन शाखेत वरिष्ठ लिपिक असताना आपण प्रकाशन शाखेत वरिष्ठ स.स. होते. (किरकोळ प्रकाशने ) शेवटी हिऱ्याला कुठेही भिरकावून टाका तो चमकणारच.
– चंद्रकांत. माहिती खाते, मुंबई.

सुवर्ण सह्याद्री चा इतिहास संग्रही ठेवण्यासारखा आहे. देवेंद्र भुजबळ यांना तेथे काम करण्याची संधी मिळाली, अजून ही मिळते आहे, त्याबद्दल सह्याद्री आणि देवेंद्र अभिनंदनास पात्र आहे. 🌹🙏🌹

असा रंगला भोंडला, मधे विदर्भातील गाण्यात थोडा फरक आहे. जसे खिडकी त होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता. … छान मजाच मजा येते…..
– सुधाकर धारव. यवतमाळ.

नमस्कार
अभिनंदन…
अभिमान व आमचं सुदैव पण म्हणावेसे वाटते. कारण या व्यासपीठावर आपला, आपल्या कार्याचा ठसा या उद्याच्या सुवर्ण सह्याद्री कार्यक्रम लेखामुळे तरी आमच्या द्रृष्टिस आणलात.
एक नक्की कि आपण नमूद केलेले संस्कार व संस्कृती कार्यक्रम तेंव्हा आपणा सर्वांना बघायला मिळत होते याची भयंकर चुटपुट लागली नव्हे मनाची सल बोचरी झाली.
ठिक आहे बदल व्हायला हवेतच, शेवटी कालाय तस्मै नमः
पण जे कार्य केले आहे व करत आहात त्यांना आमचा प्रणाम.
माॅ भवानी उदंड यश देत राहो हिच आमची ईश्वर चरणी प्रार्थनीय सदिच्छा..
धन्यवाद. जय हिंद की सेवा.
– संदीप मोरे. नेरळ

अतिशय सुरेख लिहिले आहे सर…सगळ्यांच्या साठवणीतला आणि हृदयातल्या आठवणींचा दिवस🙏
राग सुरभी. 👌👌👌 रागां बद्दल मोजक्या शब्दांत इतकी विस्तृत माहिती… अतिशय वाचनीय 🙏
– शिवानी गोंडाळ. मेकप आर्टिस्ट, मुंबई दूरदर्शन

दूरदर्शनच्या अंतरंगात प्रथमत: मी डोकावलो ते साहित्यिक शन्ना नवरे यांनी श्री. ज.जोशींची मुलाखत घेतली त्यावेळी. त्यानंतर एकदा कधीतरी याकुब आणि बबन प्रभू यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण पाहिले होते. आपल्यालाही परत इथे येता येईल का ? . . सहज मनात विचार येऊन गेला आणि तो योग आला. एका अष्टपैलू कलाकाराची – अनंत वेलणकर याची मुलाखत मी दूरदर्शनवर घेतली. बहुतेक तो कार्यक्रम चांगला झाला असावा. कारण त्यानंतर जवळजवळ, दूरदर्शनवर मी १८ – २० मुलाखती घेतल्या. याशिवाय ग्रंथपरिचय, डॉक्युमेंटरी साठी लेखन, आणि डॉक्युमेंटरीला आवाज देणे या गोष्टीबरोबरच दूरदर्शनसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांची इंग्रजीतील वचने इ. मराठीत करून दूरदर्शनला त्यांच्या मागणीनुसार दिली आणि फिलर म्हणून ती वापरली जात असत. या दरम्यान मी दूरदर्शनसाठी अेक २८ मिनिटांचं नाटकही लिहिलं आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. दूरदर्शनचा सुरुवातीचा पडदा हा खरोखरच वेड लावणारा होता. फक्त तीन तासांचा कार्यक्रम पाहायला मिळावा यासाठी किती नियोजन -किती आटापिटा करत लोक ! खरोखरच सुवर्णकाळ होता तो. एकापेक्षा एक सरस नि श्रेष्ठ कलाकार — बातमी सांगणारे– कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारे किंवा कार्यक्रम सादर करणारे अनेक दिग्गज त्यावेळी दूरदर्शनवर पाहायला मिळाले . सुहासिनी मुळगावकर, भक्ती बर्वे इत्यादी अनेक नावे सांगता येतील. माझ्या आठवणी प्रमाणे आपले निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळजी यांचा आणि माझा परिचय आकाशानंदांच्या कार्यालयात झाला 88! अर्थात पुढे ते आपल्या कार्यालयात आले ! एकंदरीतच कार्यक्रम पाहणाऱ्या दर्शकांना जसा तो काळ विसरता येत नाही तसाच प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेतलेल्या व्यक्तीही तो विसरू शकत नाहीत. फक्त तीन तास टिव्ही पाहण्यासाठी कोण ते नियोजन, कोण तो आटापिटा ! खरोखरच सुवर्ण काळ होता तो . .
ते दिवस कुणीच विसरू शकत नाही. .
– दत्ता कुलकर्णी.
मा. उपमुख्यमंत्री यांचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी

सर सुवर्ण सह्याद्री : 🎂अप्रतिम ..🙏 माझे दोन्ही भाऊ 15 वर्षा आणि पत्नी गेल्या 10 वर्षा पासुन दुरदर्शन सह्याद्री वाहिनी साठी स्ट्रिंजर म्हणून नांदेड, हिंगोली जिल्ह्यासाठी काम करतात. त्यांना सामुहिक वाचुन दाखविला ..🙏छान, सुंदर अप्रतिम. आपण काम केलेल्या संस्थेबद्दल काय अफलातुन, तत्कालीन वास्तव लिहिलत सर 🫡
– विजय होकरणे. नांदेड

मी संपूर्ण कार्यक्रम दूरदर्शनवर पाहिला. अत्यन्त सुन्दर आणि अविस्मरणीय. आजकाल तसे कार्यक्रम होत नाहीत याची खंत वाटते. मात्र आपल्या लेखामुळे मला तो सुवर्ण काळ आनंद देऊन गेला धन्यवाद.
– निरंजन राऊत. मुंबई.

मुंबई दूरदर्शनच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्तीबद्दल शुभेच्छा.
वरील सर्व कलाकारांच्या मांदियाळीत स्मिता पाटील, दिलीप प्रभावळकर, तबस्सुम हे कसे नाहीत ?
– डॉ मधुमंजिरी गटने. मुंबई.

👌🏻 आदर्श कोमनादेवी आॅक्सिजन पार्क – काळाची भान हरपून सेवा हिच ती खरी निसर्गाच्या इशस्तवनाची विलोभनीय उपक्रमशीलता सातत्याने सर्वांनाच समाधान निर्माण करो..
जय वसुंधरा, जय हिंद की सेवा
– संदीप मोरे. नेरळ

विकास भावे सर अप्रतिम गाणे निवडले आहे आणि त्यातल्या प्रेमिकांच्या भावना ही अतिशय तरल आणि सुदंर रित्या दाखवल्या आहेत खूपच छान 😀👌👌👌👌👍👍👍👍💐💐
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments