Thursday, January 16, 2025
HomeUncategorizedवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार, मंडळी.
गेल्या आठवड्यात आषाढी एकादशी, गुरू पौर्णिमा असे मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले दिवस होते. त्याची आपण दखल घेतली. आपला खूप छान प्रतिसाद मिळाला.
खुद्द आपल्या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्यावर सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेला “माझे गुरू, माझे मार्गदर्शक” या लेखाला भरभरून दाद मिळाली.
जगात माणूस कितीही दूर गेला तरी आपल्या मायभूमीला विसरू शकत नाही, हे मोरोक्को मधील श्री प्रकाश फासाटे यांच्या “आम्ही हरिगावकर…” ने दाखवून दिले.
संजल गावंडे आणि रश्मी पाटील या महाराष्ट्र कन्यांनी या आठवड्यात मिळवलेले यश चिरकाल आठवणीत राहील. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
धन्यवाद.
आपली टीम एनएसटी.

अतिशय उत्कृष्ट शब्दांकन करून हरिगावचे हुबेहुब वर्णन समोर उभे करून पुन्हा त्या आठवणींना प्रकाशसरांनी उजाळा दिला, तो बालपणीचा काळ सुखाचा, अन् समृद्धीचा वारसा आम्हा हरिगावकर आजी-आजोबांचा, वरिष्ठांचा अभिमान आम्हा आमुच्या त्या हरिगावचा
याच भूमीत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा वाटे मनी या स्वप्ननगरीचा उद्धार व्हावा.
– श्रीमती अनिता बाबासाहेब चेडे

या पोर्टलचे निर्माणकर्ता आणि संपादक यांचा प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक प्रवास वाचला. नवनिर्माण करण्याच्या देवेंद्र सरांच्या ध्यासाचे विशेष कौतुक,
आपणास सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना
– डॉ संपदा पाटेगावकर

संजल म्हणजे अमृत, तुझे काम, तुझे कष्ट, तुझी अफाट मेहनत, तुझे स्वप्न साकार होण्यासाठी घेतलेली भरारी.
कौतूक करावे तेवढे शब्द कमीच आहेत. मला माझ्या मैत्रिणीचा सुरेखा गावंडेचा अभिमान आहे. आणि
अलका तुझ्या लेखन शैलीची कमाल आहे.
संजल, तुला पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छां.
अनेक हार्दिक अभिनंदन.
– पूर्णिमा शेंडे, मुंबई

🌹रश्मीच्या उतुंग यशासाठी तिचे अभिनंदन 🌹तसेच पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🌹 MTNL ची कर्मचारी सौ सुरेखा गावंडे यांची कन्या संजल हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळविलेले यश खरंच कौतुकास्पद व गौरवास्पद आहे. संजल आणि तिच्या आई वडिलांचे हार्दिक अभिनंदन 🙏

श्री देवेंद्र भुजबळ साहेबांची मुलाखत आजच्या तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी. परिस्थितीचा बाऊ न करता, मिळेल ते काम व त्याला कष्टाची जोड देऊन आयुष्यात गगनभरारी घेतली. दहावी नापास ते महाराष्ट्र शासनामध्ये उच्च पदापर्यंत सरकारी नोकरी असा अवर्णनीय जीवन प्रवास. हॅट्स ऑफ.
भुजबळ साहेब.🙏
– मोहन आरोटे, कल्याण

Hearty and dear Rashmi…God bless you abundantly. Truly inspiring.Very proud of you and your family

– Shobhana Kumar, ❤💐💐

Great initiative of blood donation and eye donationa and best wishes for Madan’s birthday and long and healthy life. Regards.
– Dilip Lunawat

रश्मीची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद.
वसंत संख्ये

Hats off Rashmi 👍
Subha

Wow!! Amazing Rashmi! Truly Rockstar !!👏🏽👏🏽👌🏽
– Poonam Shukla

रश्मी व जतिन बहीण भावाला अगदी लहान पणं पासून ओळखते, दोघांचे ही कौतुक कराल तेवढे शब्द अपुरे पडतात. आई अर्चना व मी शिक्षिका असल्या मुळे नेहमी आमच्या दोघींचे कोणती परीक्षा, सध्याची प्रगती, अजून काय करावे लागेल, मुलांना प्रेरणादायक याच गोष्टी वर चर्चा असते. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा खुप छान, So My best wishes are always with you Rashmi
– सौ मंगला बिराजदार

अतिशय प्रेरणादायी मुलाखत आहे श्री. भुजबळ सरांची. आव्हानांना सामोरे जावून केलेली ध्येयप्राप्ती त्यांच्यातील निर्धार वृत्तीचे दर्शन आहे. यशाने बहुतेक वेळा माणसे जगापासून तुटत जातात परंतु श्री. भुजबळ सरांनी परमार्थाची जी व्याख्या सांगितली आहे  त्यावरून त्यांची माणूस म्हणून असलेली थोरवी लक्षात येते.
सुंदर मुलाखत आणि सुंदर शब्दांकन, आपले मनापासून आभार
– डॉ गौरी जोशी-कंसारा, अमेरिका.

अभिनंदन सुरेखा आणि कुटुंबाचे ! संजलने आपल्या स्वप्नपूर्तिसाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. अशीच भरारी घेत रहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
– प्रीति परदेशी, मुंबई

संजलनी तिच्या ध्येयपूर्तीसाठी केलेली मेहनत व तोपर्यंतचा तिचा प्रवास तिला स्वत:ला व कुटुंबीयांना अभिमानास्पद आहे. तिला उदंड यश मिळो या शुभकामना.
माननीय देवेंद्र भुजबळ सरांची मुलाखत मला एैकता आली नाही. खुप प्रयत्न करूनहि मला रेडीयोची लींक उघडणे जमले नाही. बाकी सर्वांची प्रतिक्रिया वाचून त्याचा जास्त खेद वाटतोय. मुलाखत खुप सुंदर रंगली व त्यांनी दिलेला बहुमोल सल्ला मला आवडला. त्यांनी सुरू केलेली वेबपोर्टल, “न्युज स्टोरी टुडे”, ला भरघोस यश येवो ह्या माझ्या सदिच्छां. या वेबपोर्टलमुळे मला व माझ्या सारख्या सर्वांना उत्तम लिखाण वाचनाची संधी तर मिळतेच शिवाय त्यांचे स्वत:चे लिखाण वाचकांपर्यंत पोचवता येते. ही संधी त्यानी दिल्याबद्दल मनापासून खुप खुप आभार
– सौ लीना फाटक, इंग्लंड.

अलका, सुंदर लेखन झाले आहे. आपल्याच मैत्रिणीच्या मुलीने, स्व: कष्टाने मिळवलेले यश, खरोखरच कौतुकास्पद आहे. थोडक्यात “मूर्ती लहान किर्ती महान!”

सर, खूपच सुंदर लेख, वाचनात आला. तुमच्या लेखणीतून असे प्रेरणादायी लेख आपले वेब पोर्टल आमच्या पर्यंत पोहचवत आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या संक्षिप्त आलेखात खूप काही वाचायला मिळाले. धन्यवाद !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

काही कारणास्तव दि. 18/7/2021 रोजी श्री, देवेंद्र भुजबळ साहेब यांची रेडिओ विश्वास या इंटरनेट चॅनल वर लाईव्ह प्रसारित झालेली मुलाखत ऐकू शकलो नव्हतो. परंतु त्यांच्या पत्नी सौ अलका भुजबळ यांच्या सहकार्याने प्रसारित झालेली ऑडिओ मुलाखत ऐकण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी त्यांचा 🙏आभारी आहे.
खरेच श्री देवेंद्र भुजबळ साहेब यांनी गरीब परिस्थिला कोणालाही जबाबदार न धरता, गरीब परिस्थितीचे रडगाणे न गाता मिळेल ते काम करून प्रतिकूल परीस्थीवर मात केली व जीवनात यशस्वी झाले. दहावी नापास झालेला विद्यार्थी मनात एखादी खूणगाठ बांधली तर सरकारी नोकरीं मध्ये उच्च पदा भूषवू शकतो हे दाखवून दिले.त्यांची मुलाखत ऐकून आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल. श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 🌹
– मोहन आरोटे, कल्याण

मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल डॉ अंजुषा पाटील यांनी सोप्या भाषेत आणि चांगला सल्ला दिला आहे.
– मेघना साने

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आपण लिहिलेला लेख आवडला आहे. चांगल्या मोठ्या प्रतिभेचा आविष्कार त्यांच्या लेखणीत होता. अशा या महान प्रतिभावंताला विनम्र अभिवादन…
– विलास सरोदे

सन्माननीय देवेंद्र भुजबळ साहेब यांची विश्वास रेडिओ स्टेशन ९०.८ वर प्रसारित करण्यात आलेली व मेघना साने मॅडम नी घेतलेली मुलाखत अप्रतिम विचाराने ओतप्रोत भरलेली होती आणि ती आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असून तरूणांनी एखाद्या वळनावरच्या अपयशामुळे न खचता ते एक आव्हान स्विकारून पुढे चालत राहण्यासाठी प्रेरणादायी असा साहेबाचा जीवन प्रवास आहे.
म्हणूनच मनावेसे वाटते की, जर तरूणांनी आपल्या स्वप्नांची नवी दिशा ठरवून आपले इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर ते नक्कीच यशवंत होऊ शकतात हे भुजबळ साहेबांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येते.
साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन !!
आपला स्नेहांकित,
राजाराम जाधव, उलवे, नवी मुंबई

भुजबळसाहेबांचा खडतर व कष्टमय जीवन प्रवास समजला.
“जया अंगी मोठेपण,तया यातना कठीण” हेच खरे…
– के ए शिंदे सर, अहमदनगर

मा.देवेंद्रजी भुजबळ साहेबांचा जीवनप्रवास खरोखरीच खूप खडतर, धडाडीचा, संघर्षाचा आहे. अत्यंत प्रेणादायी आहे. सरांचे व्यक्तीमत्व सुंदर शब्दांमध्ये उलगडलेत आपण.
– दशरथ पाटील, डीएसपी, नगर 👌👌👏👏

आज प्रथमच तुमच्या जिवनासंबंधीची जिवनगाथा माझ्या वाचन्यात आली. खरोखर तुम्ही कीती महान आहात ते वाचनातून कळाले.
अशोक बारस्कर, मलकापूर

🌹🌹👏🌹🌹अत्यंत प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक प्रवास
गुरुपौर्णिमा निमित्ताने आपणास प्रणाम
– डॉ संपदा पाटगावकर,
विलेपार्ले, मुंबई.👏🏽👏🏽👏🏽👏🏽

Hats off Sir👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐 खूप आनंद झाला वाचून.. तुमची वैयक्तिक माहिती खूपच प्रेरणादायी आहे
– करुणा पाटील, माध्यम समनव्यक, पुणे🙏🙏

अनेक, अडचणींवर,मात, करून, यशस्वी झालात, त्याला, मानाचा, मुजरा, अभिनंदन💐
– विलास प्रधान, मुंबई.

खूपच छान, प्रेरणादायी
व्यक्तिमत्वाबद्दल तळमळीने लिहिलेला उत्तम लेख.
– राजेंद्र घरत, पत्रकार, नवी मुंबई, 🤝🤝🤝🌹

🕉️🏋🏻‍♀️🌹रश्मी हेडे यांचा आपल्या गुरुविषयीचा प्रदीर्घ लेख वाचला.देवेंद्र नामक गुरूंनी शिक्षण काळात किती संघर्ष केला. यातील काही माहिती नवी वाटली. दुरदर्शन मधून आपल्याला माहिती जनसंपर्क विभागात आणण्याचे जे जे प्रयत्न झाले त्यात खारीचा वाटा मला वाटते माझा असावा असे अंधुकसे आठवते. असो आपली संघर्ष गाथा आणि कमालीची जिद्द वाचून इतरांना प्रेरणादायी निश्चितपणे ठरेल यात कसलाही संदेह नाही. रश्मीजींचा गुरू माझ्या सेवा कार्यात मला एक जीवाभावाचा मित्र म्हणून लाभला याचा मला किती अभिमान वाटतो याची कल्पना आपण व रश्मीजीं देखील करु शकणार नाही. सौ अलकाताईंनी त्यांना उत्कटपणे साथ दिली याचेही मूल्य फार मोठे आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. असो.आपणास मनापासून हार्दिक शुभेच्छा.
🏋🏻‍♀️रश्मी हेडे यांनी फार चांगले व्यक्तीचित्र रेखाटल्याबद्दल त्यांचे लेखन कौशल्याचे कौतुक केलेच पाहिजे त्यांना देखील माझ्या शुभेच्छा कळवाव्यात, धन्यवाद.
🏋🏻‍♀️सुधाकर तोरणे🌹निवृत्त माहिती संचालक

खूप छान लिहिलं सर रश्मी मॅडमनी.
– ऍड चव्हाण, अमरावती.

रश्मी ताई तुम्ही जर त्यानी
बहुजन संघटन आणि रेडिओ
विश्वास या ठिकाणी दिलेल्या
मुलाखती नीट ऐकल्या असतील
तर देवेंद्रजी या व्यक्तिमत्वाला
मोजक्या शब्दात व्यक्त करणे
हा त्यांचा सच्चे पणा दर्शवत
नाही
मी त्याना अजूनही ओळखण्यास कमी पडलो
वैभवाचे प्रदर्शन बरेचजण करतात पण लहानपण कसे
हलाखीत गेले किती वेळा शाळेत
नापास झालो हे सत्य प्रेक्षकांच्या
समोर बिनदिक्कत मांडणारे
किती सांगू शकाल ?

रश्मीताई तुम्ही नीट ऐकल्या
नाहीत असे मला म्हणायचे नाही
शब्दांचे अर्थ आणि वक्त्याच्या
चेहऱ्यावरील हावभाव वक्ता
बोलताना बाजूला ठेवलेल्या
मग मधून किती वेळा किती
घुटके घेतो यावरून माझे निष्कर्ष
ठरवतो
असो मी एकक म्हणेन
“या सम हा” !
भुजबळ साहेब, अशा ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक पोस्ट ह्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत…… अनेकात एक जरी त्यातून प्रेरित झाला आणि तो आपले आयुष्य बदलू शकला तरी आपल्या पोस्टची सफलता होय…. यात कुठल्याही प्रकारचा आत्मप्रौढीपणा नाही….. खरोखर आपला जीवनप्रवास वाचण्यासारखा आणि बोध घेण्यासारखा असाच आहे…. सॅल्युट सरजी !
– डॉ चिदानंद फाळके नाशिक.

🌸खूप छान! आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे सरांचे वाचून खूप आनंद झाला.🌿
विशेष म्हणजे सर आमच्या गावाचे आहेत. हे वाचून छाती पुढे आली.
सरांना गुरू पौर्णिमा निमित्ताने मनापासून शुभेच्छा🌹🌹
– विश्वास सोहोनी, पुणे.

अगदी बरोबर तुमची कहाणी आहेच प्रेरणादायी!मी वर कवितेत व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे !🌹🌹
प्रा.डॉ स्मिता होटे, पीएचडी गाईड, नागपूर.

आदरणीय श्री . देवेंद्रजी भुजबळ सर ,
सा. क. व्य. समूहावरील रश्मी हेडे यांचा आपल्या संदर्भातून असलेला लेख वाचला. आपल्या मतोश्रींनी आपल्याला दिलेला मंत्र वाचल्यावर त्यांच्या आपल्यावर असणाऱ्या मायेचं वर्णन करावं वाटलं तर मी असं म्हणेन..

गरम तव्यावरची पोळी
नाही तिला पोळायची।
पोळीच्या तीन पदरात
माया तिची असायची।।

आपण अनेक कठीण परिस्थितीतून जाऊन आयुष्य घडवलं , अशा व्यक्ती माझ्या जीवनात आदर्श म्हणून ज्या ठेवल्या होत्या त्यात आपल्या सारख्या सुविद्य व नम्र असणाऱ्या महान व्यक्तीचा लाभ मिळावा हे माझे पूर्व सुकृत असावे.
सर , मी ही शिक्षक होतो. मी माझ्या आई वडिलांमुळे घडलो. आज गुरुपौर्णिमा दिनी आपल्याशी अप्रत्यक्ष संवाद साधताना त्यांच्या कष्टाचं फलित साध्य झालं याचा परमानंद आहे.
माझेही अनेक विद्यार्थी उच्चस्थ आहेत. आज माझे वय 78 आहे.
मी शास्त्र पदवीधर असूनही साहित्य आवड होती, म्हणून साहित्य अभ्यास केला. अनेक मार्गदर्शी लाभले.
माझे 2 काव्य संग्रह व 1 ललित लेखाचे, अशी एकूण तीन पुस्तक झाली. असो.
आपल्याविषयीचा लेख खुप भावला, म्हणून हा छोटासा आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न…
आपल्या व्यस्त कामात अडथळा आणला, क्षमस्व.
राहवलं नाही, म्हणून लेखन केले.
आपला हितचिंतक व विश्वासू
– अरुण पुराणिक

रश्मी फेसबुक वर ,सरानविषयी लीहलेस ते वाचून मी 👍🏻तर केले पण मला अजून लिहायचे होते
पण चुकून बँटिंग करणारे चित्र पाठवले.
चूकले असेल तरी अर्थ काढला तर चांगला निघेल

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट पान येतात तेव्हा, पुस्तक बंद न करता, पान उलटून नवीन लिहायला सुरुवात करावी, वडीलांची शिकवण !!
रश्मी तू लिहीलेले वाचून मला लिहाण्याचा मोह झाला.
कठीण परिस्थितीत संघर्ष झेल्ल्यानंतर मिळालेले यश !!मला वाटते आत्मबळ असावे..
आत्मबळाच्या जोरावर जे यश सरानी मिळवलेल आहे
ते तू सांगितले, वाचून छान वाटले.
सौ आशा ला सरान विषयी खूप आदर आहे.
ती मला नेहमी सांगत असते.
माझ लिखाण मी सरानां पाठवावे असा आशा चा व अशोकरावांचा आग्रह असतो.
– सुरेखा तिवाटणे.

नमस्कार सर.
गुरुपूर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
सर, तुमची यशगाथा आणि संघर्षच वाचून खूप प्रेरणा मिळाली. तुमचा आतापर्यंतचा प्रवास हा खरोखरं प्रेरणादायी आहे.
– प्रकाश फासाटे, अल जदीदा, मोरोक्को
(नॉर्थ आफ्रिका)

💐💐💐💐
आदरणीय भुजबळ सरांचा प्रेरणादायी प्रवास ! सादर वंदन🙏🙏🙏🙏
अरविंद कुलकर्णी, पत्रकार पुणे.

Devendra jee hatss of to you n your courage 🙏🙏👍👍

खूप वर्षांपूर्वीपासून मी देवेन्द्र भुजबळ हे नाव ऐकून होते शासकीय अधिकारी दूरदर्शनवर पाहिले सुद्धा होते या नावाचा एक दबदबा होता मी सुद्धा मटेनिलि मध्ये कार्यरत होते आणि माझ्या समवेत अलका भुजबळ एकाच कार्यालयात होतो त्याच दरम्यान तिचा विवाह देवेन्द्र भुजबळ यांच्याशी झाला, त्यावेळी असे
वाटले नव्हते की तिच्या पतिराजांशी आपली भेट होईल
आणि ते मला लिहीते करतील.

मला नोकरी लागण्यापूर्वीच पार्ले महाविद्यालयात शिकत असताना, आकाशवाणी मुंबई केंद्रावर युववाणी या कार्यक्रमात अधून मधून सहभागी होत असे तसेच
डॉ वसंत देव, डॉ सदा कराडे इ अध्यापकांचे साहित्य संस्कार लाभले त्यामुळे कविता बहरत गेली. अनेक कवीसंमेलनातून निमंत्रित कवयित्री म्हणून सन्मान प्राप्त झाले, मुंबई महाराष्ट्राबाहेर सुद्धा कविता वाचनाची संधी मिळाली शब्द परिवार तर्फे आयोजित संमेलनाची माहिती मिळाली मलेशिया देशातील विविध स्थलदर्शन तसेच कविता वाचनाची संधी मिळाली,

या संमेलनाचे उद्घघाटन आदरणीय देवेन्द्रजी भुजबळ
यांच्या हस्ते झाले कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटून अलकाची ओळख सांगितली, ते अतिशय निगर्वी आणि मोकळेपणाने बोलत होते नंतरच्या काही कार्यक्रमात भेटले, तेव्हा सुद्धा कवितांबद्दल बोलले.

तेथे अनेक कवी लेखक भेटले अजूनही बरेच जण संपर्कात आहेत. पण मला लिहीते केले ते भुजबळ
सरांनी, मी त्यांना म्हटले सुद्धा की, मी पद्यच लिहीते गद्य सहसा नाही लिहीत. तर ते म्हणाले उद्या सकाळी पाठवा लेख, मी रात्रीच लिहून पूर्ण करुन पाठवून पण दिला डॉ डे साठी, कवितेच्या छंदामुळे अनेक मान्यवरांनी प्रोत्साहन दिले. पण आता निवृत्तीनंतर भेटलेल्या भुजबळ सरांनी जी नवी उमेद दिली ते वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.

तरीही एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही,
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी इतकी मजल गाठली, त्याला
तोड नाही आणि अशा प्रेरक व्यक्तीला आई सुद्धा अशी लाभली, जिने नम्र रहाण्याची व माणुसकीची शिकवण दिली.
देवेन्द्र भुजबळ सरांनी ती आत्मसात केली धन्य ती माता
आणि त्यांचे सुपुत्र सर……..!

– सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार ✍️

आदरणीय भुजबळ सरांचा जीवनप्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आदरणीय रश्मीताईंनी तो उलगडून सांगितला. रशमीताईंचे आभार. भुजबळ सर व ग्रुपमधील सर्व गुरूरुपी महानुभावांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!🥁🥁👍👍
– प्रा मोहन काळे, अकोला

रश्मी ताई तुम्ही जर त्यानी बहुजन संघटन आणि रेडिओ विश्वास या ठिकाणी दिलेल्या मुलाखती नीट ऐकल्अ सतील तर देवेंद्रजी या व्यक्तिमत्वाला मोजक्या शब्दात व्यक्त करणे हा त्यांचा सच्चे पणा दर्शवत
नाही मी त्याना अजूनही ओळखण्यास कमी पडलो
वैभवाचे प्रदर्शन बरेचजण करतात पण लहानपण कसे
हलाखीत गेले किती वेळा शाळेत नापास झालो हे सत्य प्रेक्षकांच्य समोर बिनदिक्कत मांडणारे  किती सांगू शकाल ?

रश्मीताई तुम्ही नीट ऐकल्या
नाहीत असे मला म्हणायचे नाही
शब्दांचे अर्थ आणि वक्त्याच्या
चेहऱ्यावरील हावभाव वक्ता
बोलताना बाजूला ठेवलेल्या
मग मधून किती वेळा किती
घुटके घेतो यावरून माझे निष्कर्ष
ठरवतो असो .
मी एकच म्हणेन
” या सम हा”!

रश्मी ताई खुप छान लिहिले भेटू या
– कांचन सराफ, अमरावती.

भुजबळ साहेब, अशा ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक पोस्ट ह्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत…… अनेकात एक जरी त्यातून प्रेरित झाला आणि तो आपले आयुष्य बदलू शकला तरी आपल्या पोस्टची सफलता होय…. यात कुठल्याही प्रकारचा आत्मप्रौढीपणा नाही….. खरोखर आपला जीवनप्रवास वाचण्यासारखा आणि बोध घेण्यासारखा असाच आहे…. सॅल्युट सरजी !
– डॉ चिदानंद फाळके, नाशिक.

🌸खूप छान! आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे सरांचे वाचून खूप आनंद झाला.🌿
विशेष म्हणजे सर आमच्या गावाचे आहेत. हे वाचून छाती पुढे आली.
सरांना गुरू पौर्णिमा निमित्ताने मनापासून शुभेच्छा🌹🌹
– विश्वास सोहोनी, पुणे.

Devendra jee hatss of to you n your courage 🙏🙏👍👍-

– Sangita Satoskar Mumbai.

नमस्कार, मंडळी.
माझ्या वरील जीवन लेखावर सर्वश्री डॉ नझीर शेख, ऍडमिन श्री पांडुरंग कुलकर्णी, श्री सुहास सांबरे, डॉ चिदानंद फाळके, प्रा मोहन काळे, डॉ प्रवीण जोशी, डॉ गौरी जोशी कंसारा, जयश्री काळवीट आणि अनेकांनी ज्या शुभ भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपण सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. मी कुणाच्याही काही कामी येणार असल्यास मला आनंदच वाटेल.

गुरू पौर्णिमेच्या सर्व समूह सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा💐
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय