Saturday, March 15, 2025

शालू

संदुकीतून होता डोकावत
खुणावत होता नजरेला
स्पर्श होताच तनास
स्मृतिगंध की हो दरवळला !

रंग त्याचा मोरपिशी
वेलबुट्ट्यांची त्यावर नक्षी
नाचती मोर पदरावरी
स्पर्श होताच झाले वेडीपिशी !

नवलाईचे सण साजरे
केले तयाच्या साक्षीत
गंध कुंकू अन् अत्तराचे
सुवास त्याच्याच समवेत !

चाहूल बाल हुंकाराची
साजरी केली तव स्पर्शाने
मन झाले पिसापरी
त्याच्याच कल्पनेने !

रेशमी उभे आडवे धागे
माहेर सासर जोडणारे
तनमनाला फुलविणारे
नवनात्यांना बांधणारे !

आता आहेस तू कोपऱ्यात
असंख्य साड्यांच्या ढिगाऱ्यात
पण सर नाही त्या साऱ्यांत
सुखद दिवस रेंगाळती मनांत !

मेधा जोशी

– रचना : मेधा जोशी. ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments