सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक १४ आॕक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजता नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. ‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते – स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे बोलणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन ‘सावरकर विचार मंच, नवी मुंबई ‘ तर्फे करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. प्रवेशिकेसाठी ९९३०४१०००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
किंवा आपण पुढील लिंक उघडून प्रवेशिकेसाठी नोंदणी करू शकता.
https://forms.gle/rLYKX6jPNZyaQwXo8
या कार्यक्रमास अतिथी म्हणून आमदार गणेश नाईक, विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई या संस्थेचे सह-कार्यवाह स्वप्नील सावरकर, स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्यवाह उत्तम पवार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ‘सावरकर विचार मंच, नवी मुंबई’ चे अध्यक्ष श्री संतोष कानडे यांनी केले आहे.
सावरकर विचारांचा प्रसार करणाऱ्या ‘सावरकर विचार मंच, नवी मुंबई’ तर्फे यापूर्वीही ‘शतजन्म शोधिताना‘ हा कार्यक्रम तसेच ‘साहसी सावरकर‘ या विषयावर इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांचे व्याख्यान भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800