Sunday, August 31, 2025
Homeसाहित्यश्री गणेश : काही रचना

श्री गणेश : काही रचना

१. बाप्पा आले

ढोल ताशे वाजू लागले
आले आले, बाप्पा आले
गुलाल, शेंदूर उधळीत सारे
पौरजन ते धावत सुटले
बाप्पा आले, बाप्पा आले
  
प्राजक्ताचे सडे शिंपले
रांगोळीने रस्ते सजले.

दागदागिने लेऊन साऱ्या
भरजरी वस्त्रे लेऊन ती
हाती घेऊन तबक आरती
सुवासिनी त्या औक्षण करती
गणराय हासून आशिष देती.
      
तुंदिल तनु सावरीत, मूषकस्वार
प्रसाद मोदक हाती अपार
भक्तांचे रक्षण करण्या तत्पर
पृथ्वीवर अवतरले सत्वर
गजाननाचा करू जयजयकार
बाप्पा आले, बाप्पा आले.

– रचना : सुलभा गुप्ते. पुणे

२. जय जय गणेश

उत्सुकतेने करू आवाहन,
जय जय गणेश, जय गजानन,
घराघरांतून हो पुजा आरती,
अथर्वशीर्षाचे होई पठण,

निरखून बघता गणेशमूर्ती,
विलोभनीय मग येई प्रचिती,
गणेश लहरी पृथ्वीवरती,
करी भक्ताचे संकटी रक्षण,

विघ्न विनायक असा अवतरे,
मोठे मस्तक, परशू पाश धरे,
आशिर्वाद तो देई भक्तासी,
मोदक प्रिय हो, प्रसाद भक्षण,

चौदा विद्यांचा हा अधिपती,
चौसष्ट कला हो ज्याच्या हाती,
प्रसन्न होता, कला निपुणता,
यश, ऐश्वर्य, नेतृत्व वाढती गुण…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव

३. भक्ती गणेशाची

बुद्धिदेवता तू । तूच सुखकर्ता
तूच दुःखहर्ता। विनायका //१//

तुझे गजमुख। ओढी पितांबर
तूच लंबोदर । गजानना //२//

प्रथम वंदन। तुज गणराया
उजळेल काया । विघ्नेश्वरा //३//

एकदंत गणा।पार्वतीच्या बाळा
भक्तीचाच मळा। फुलविला //४//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर

४. बाप्पा आला रे आला..

बाप्पा आला रे आला
आंनदी आनंद झाला…

छोटेसे तुझे रूप,
सुंदर दिसें खुप..
हाती घेऊन भाला,
बाप्पा आला रे आला..

नक्षीदार आसन,
दश दिन शासन..
राजा आंनदी झाला,
बाप्पा आला रे आला..

कमानी आसमान,
झाले विराजमान..
शोभती पुष्पमाला,
बाप्पा आला रे आला..

नेसला पितांबर,
डोईवर अंबर..
संग उंदीर आला,
बाप्पा आला रे आला..

गौराई त्या येतील,
जेऊन त्या जातील..
आज सणा वाराला,
बाप्पा आला रे आला..

— रचना : सुभाष कासार. नवी मुंबई

५. गणपती बाप्पा मोरया

सगळीकडेच दिसतो
भक्ती, श्रध्दा, परंपराचा जल्लोष
गणपती बाप्पाच्या चरणी
लहानमोठे होतात बेहोश !१!

दरवर्षीच बाप्पा येतो
मनाला आस लावून
इच्छापूर्तीचा सोहळा वाटे
आनंद जातो ओसंडून !२!

१४ विद्या, ६४ कलाधिपती
शंकर – पार्वतीचा लाडका पुत्र
सगळ्यांचाच लाडका तो
कळेना काय त्यामागचे सुत्र !३!

ढोल ताशांच्या गजराने
बाप्पाचे आगमन होते
सान – थोर सारे कसे
आनंदात धुंद होऊन जाते !४!

दहा दिवसांचा हा सोहळा
भक्तीने वाटतो आगळावेगळा
सगळा दिवस गाजतो
गणपती बाप्पाच्या गजराने !!

गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments