मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल देत असलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचा विश्वभरारी फौंडेशन आणि नॅशनल लायब्ररी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात उत्कृष्ट स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

स्वागताध्यक्ष आमदार श्री पराग आळवणी, अध्यक्ष लेखक- कवी श्री किरण येले, संमेलनाच्या आयोजिका सौ लता गुठे आणि इतर मान्यवर, साहित्य रसिक या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री देवेंद्र भुजबळ यांनी, त्यांनी लिहिलेली “आम्ही अधिकारी झालो”; “करिअरच्या नव्या दिशा”; “माध्यमभूषण” आणि “कला साहित्य भूषण” ही पुस्तके श्री शेलार यांना भेट दिली.

या संमेलनात विचार प्रवर्तक परिसंवाद, कवी संमेलन, गझल सादरीकरण, बहारदार मनोरंजनपर कार्यक्रम झाले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800*

गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन, देवेंद्र साहेब…!
देवेंद्र भुजबळ सरांचा सत्कार हा सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून साहित्यिक
व सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय कार्य केलेल्या व्यक्तिचा सन्मान आहे.
देवेंद्रजी आपला यथोचित सन्मान झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!