Saturday, June 14, 2025
Homeबातम्यासाहित्य सखी मंच : संमेलन उत्साहात संपन्न

साहित्य सखी मंच : संमेलन उत्साहात संपन्न

साहित्य सखी मंच ने नुकतेच आयोजित केलेल राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सर्व सख्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सर्वांनी हिरीरीने सहभागी होऊन कार्यक्रम रंगतदार झाला. महाराष्ट्रातील विविध भागातून येऊन कार्यक्रमात आपल्या बहारदार कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आलेल्या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. दिशा शेख, प्रा.छायाताई लोखंडे-गिरी, सीमाताई गोसावी हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी सर्व सखींना साहित्यिक दृष्टीने मोलाचे विचार दिले. तिन्ही मान्यवर सखोल अभ्यासपूर्ण बोलले. सर्वांनी भाषणं अतिउत्तम केली. एका अर्थाने ही साहित्यिक विचारांची मेजवानीच ठरली.

दिशा शेख यांनी आपल्या ओघवत्या वाणीने त्यांचे स्वानुभव कथन करत त्यांचे विचार सर्व सखींसमोर मांडले. त्यामुळे या साहित्य संमेलनाचा मूळ हेतू फलदायी ठरला. दिशा शेख यांनी सर्व मुद्दे छान मांडले जे सर्वांना पटणारे होते. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, बाईचे बाईपण जपले गेले पाहिजे जे सर्व दृष्टीने महत्वाचे आहे. स्त्रीपुरूष भेदाभेद नको, असे आवाहन करून त्यांनी तृतीय पंथीयांसाठी त्या करीत असलेल्या महत्वपूर्ण कार्याची माहिती दिली.

संमेलन मध्यंतरानंतर श्री व सौ पाटील यांनी समुपदेशानाचे महत्व सांगून प्रात्यक्षिकेही करून घेतली. सर्व सखींना हे महत्वाचे वाटले.

प्रा.डॉ.प्रतिभा मॅडम यांनी मी “अरूणा बोलतेय” हा एकपात्री प्रयोग सादर केला जो मन पिळवटून टाकणारा होता. अरुणा शानबाग जिच्यावर बलात्कार झाला होता ती ४२ वर्षे अंथरूणावर पडून होती तिच्या व्यथेचा तो भाग होता. तिच्या मनातील विचार प्रा.डाॅ.प्रतिभा मॅडम यांनी मी अरूणा बोलतेय लिहून काढले. ते पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. आता सादरीकरणही प्रतिभा मॅडम यांनी केले आहे. हे सादरीकरण पाहून मनाचा थरकाप होतो. तेव्हा विचार मनात येतो, अरुणा शानबाग ने हे सर्व कसे सोसलं असेल ? डोळ्यात अंजन घालणारा हा एकपात्री प्रयोग म्हणावा लागेल.

विविध ठिकाणांहून आलेल्या सर्व सखींनी उत्साहात आपल्या रचना सादर केल्या. प्रत्येक कवयित्रीला सन्मानचिन्ह, पुस्तकांची भेट देण्यात आली. सर्व सखी विचारांची मेजवानी, प्रेमाची शिदोरी घेऊन आपापल्या घरी परतल्या.
सर्व साहित्यिक सखींना तसेच हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांस मानाचा मुजरा.

श्री निलेश निकम सर, प्राजक्त या पितापुत्रांनी सर्व फोटोसेशन तसेच यूट्युब लाईव्ह ठेवून मोठं योगदान दिलं आहे जे प्रतिभा मॅडम यांच खरं बळ आहे.

माननिय अलकाताईंचेही या कार्यक्रमासाठी मोठे योगदान आहे. अलका ताईंना ही सलाम. सर्व सखींना खूप धन्यवाद.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण
अदिती साळवी...दूरदर्शन.. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे