सुख कधी मिळतं काहो बाजारी
सहनशक्ती मिळेल का हो कुठं
मिळाली तर घेऊन या लौकर…!!
भिजवून ठेवते संयमाच्या हृदयात
बांधून ठेवते घट्ट ओठाच्या आत…!!
दुर्लक्षाच्या उबेत छान मोड येतील
सुखाचे कोंब दिसू लागतील…!!
प्रेम आणि आपुलकीचा खमंग मसाला
परस्पर स्नेह भराचं खोबरं वर पसरुन घातलं..!!
बंधन आणि मर्यादाचं मीठ घालते चवीला
आस्था देते समजूतीची कोथिंबीर घालून थोडी..!!
साखर पेरणी करते गोड गोड शब्दाची
वाढीस लागेल गोडी, कटू बोलणे देऊ सोडून.!!
झाली तयार डिश आपुलकीची
वरुन घातली साय तृप्तीची
सजली बघा डिश आस्थेची.!!
ही डिश एकजूटीने बनवायची
अगंत पंगत करून आनंदाने चाखायची..!!
आहे नां पंगत मजेची
पहाच करून मग डिश सुखाची.!!

– रचना : सुरेखा तिवाटणे
सुरेखा ताई. खूपच छान जीवनाच्या रहस्याची कविता.