Monday, September 15, 2025
Homeलेख"सुवर्ण सह्याद्री" वृत्तान्त

“सुवर्ण सह्याद्री” वृत्तान्त

मुंबई दूरदर्शन केंद्रास २ ऑक्टोबर २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दूरदर्शन केंद्रात, दूरदर्शन
रिक्रेएशन क्लबने संस्मरणीय असा “स्नेहमिलन” कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचा थोडक्यात वृत्तान्त या पूर्वी एकदा दिलेला आहेच. पण आज थोडा अधिक सविस्तर वृत्तांत आणि दूरदर्शनवरून ८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसारित झालेल्या दूरदर्शन वृत्तांताची यू ट्यूब लिंक देत आहे.

“सुवर्ण सह्याद्री” स्नेह मिलन कार्यक्रम वरळी येथील मुंबई दूरदर्शन केंद्राच्या “स्टुडिओ ए” मध्ये अतिशय मनमोकळ्या, हृद वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी दूरदर्शन मधील दिवंगत सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गायिका तथा निवृत्त सहायक संचालक श्रीमती डॉ शैलेश श्रीवास्तव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काही भजने व गीते सादर केली. निर्माते तसेच कलाकार श्री मलकराज पंचभाई यांनी त्यांना बहारदार साथ दिली.

अभियंते अशोक बिडवान, संचालक (अभियांत्रिकी)
अर्जुन विभुते, निवृत्त अभियंते रतनकुमार उपाध्याय, सर्वश्री दिलीप तिवारी, जयंत ओक, दिवाकर सभारंजक, बळवंत शिर्सेकर यांनीही यावेळी आपापले कलागुण सादर केले.

दूरदर्शनच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच, २ ऑक्टोबर १९७२ रोजी शुभारंभाच्या कार्यक्रमात कशा गमती जमती झाल्या, हे आपल्या मिश्किल शैलीत डॉ याकूब सईद यांनी सांगून सर्वाँना चांगलेच हसवून, नव्वदीतही आपण तरुण असल्याचे दाखवून दिले.

दूरदर्शनचे निवृत्त केंद्र प्रमुख डॉ मुकेश शर्मा यांनी या वेळी बोलताना दूरदर्शनची “लोकसेवा प्रसारण” ही कशी जबाबदारी आहे, हे सांगून आपल्या काही आठवणी जागवल्या.

तर नुकतेच केंद्र प्रमुख म्हणून पाय उतार झालेले श्री नीरज अगरवाल यांचे, “आजच्या काळात स्मार्ट मोबाईल फोन मुळे प्रत्येक व्यक्ती ही निर्माता झाली (“कंटेंट क्रिएटर”) असून फार मोठी साधनसामुग्री असलेल्या दूरदर्शन पुढे सकस कार्यक्रमांच्या निर्मितीचे आव्हान आहे” हे बोल अंतर्मुख करणारे आहेत.

निवृत्त अभियंते शरद मोघे यांनी दूरदर्शनच्या पहिल्या दिवसापासूनच्या, तसेच दूरदर्शनच्या प्रसिध्द मनोऱ्यावर ते दोनदा कसे गेले, या आठवणी सांगून दूरदर्शन च्या उभारणीत इंजिनिअरिंग सेक्शन चे महत्व विषद केले.

माजी दूरदर्शन निर्माते, निवृत्त माहिती संचालक, तथा न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी दूरदर्शन व माहिती खात्यात काम करीत असतानाच्या दूरदर्शन विषयक आठवणीं सांगून दूरदर्शनची अमृत महोत्सवाकडे दमदार वाटचाल होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे,असे आवाहन केले.

याशिवाय वृत्त निवेदिका अमृता राव, लेखक प्रदीप दीक्षित, निवृत्त सहायक संचालक जयू भाटकर, वृत्त निवेदिका कल्पना साठे, निवृत्त निर्माती मीना गोखले,
निवृत्त निर्माती परवेझ कुपर, कॅमेरामन अजित नाईक, निवृत्त संचालक चंद्रकांत बर्वे, लायब्रेरियन मीरा हळदणकर, निवृत्त पेंटर शेख निजाम, ग्राफिक आर्टिस्ट विजय भिंगार्डे, निवृत्त निर्माते राम खाकाळ, कॅमेरामन प्रल्हाद डे, शबनम डे, माजी सहायक अभियंता महेंद्र भैसाने यांनीही आपले समयोचीत मनोगते व्यक्त केली.

संचालक (अभियांत्रिकी) सुनीता भिषिकर यांनी आपल्या आभार प्रदर्शनात, दूरदर्शन च्या पुढील वाटचालीत ही सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमानंतर आकर्षक, भव्य केक कापून दूरदर्शन चा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

या नंतर आयोजित करण्यात आलेल्या, अल्पोपहार प्रसंगी सर्व उपस्थित जुन्या आठवणींना उजाळा देण्यात रंगून गेले.

या कार्यक्रमासाठी “स्टुडिओ ए” मध्ये विशेष सजावट व मुख्य इमारती बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दूरदर्शनच्या सर्व शाखांचे विद्यमान अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.

डॉ मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केलेल्या,
या कार्यक्रमावर आधारित दूरदर्शन वृत्तांत ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन वर प्रसारित करण्यात आला. हा वृत्तांत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भर आजचे दूरदर्शन आणि खाजगी वाहिन्या, त्यांचे स्वरूप, प्रेक्षकांच्या अपेक्षा या विषयी विविध विद्यापीठे आणि अन्य संस्थांमध्ये ही विचार मंथन होणे, समयोचीत ठरेल.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा