वृत्त- देवप्रिया
क्षेपणांचा वेध झाली हाय देवाची फुले
परतुनी स्वर्गात गेली खिन्न देवाची मुले…
लाल अश्रू रोखुनी जी राबताना पाहिली
वाढण्यासाठीच होती खुरटलेली ही मुले!
फायद्याने चोख केले शिक्षणाला पारखे
स्वप्न शाळेचे पहाती मात्र गरिबांची मुले…
का अशी फोफावली आतिथ्यशाली विकृती
साव झाले नरपशू अन् मेजवानी ती मुले !
बाग त्यांची राख झाली पाशवी युद्धामुळे
केवढी निष्पाप होती होरपळली जी मुले…

— रचना : डाॅ.आनंद प्र.महाजन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
