नमस्कार, मंडळी.
आज पासून दररोज आपल्या पोर्टलवर
“स्वप्नरंग स्वप्नीच्या” ही दीर्घकथा प्रसिद्ध करीत आहोत. आशा आहे की, आपल्याला ही कथा ,हा प्रयोग निश्चितच आवडेल.
पुढे लेखिका प्रतिभा चांदूरकर यांचा परिचय देत आहे…
– संपादक.
परिचय
प्रतिभा आदेश चांदूरकर
यांचं शिक्षण बी कॉम, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट इतकं झालं असून त्या निवृत्त व्यावसायिक आहेत.
शताब्दी महिला सहकारी बँकेच्या त्या निवृत्त डिरेक्टर असून स्त्री शक्ती वेलफेअर असोसिएशन मध्ये सेक्रेटरी म्हणून त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे.
व्हॉइस गुरू दीपक वेलणकर ह्यांच्या अल्टीमेट व्हॉइस अकॅडमी मध्ये त्यांचं तीन लेवल पर्यंत शिक्षण झालं असून त्या “आम्ही सिद्ध लेखिका” ठाणे जिल्ह्याच्या खजिनदार तसेच अजेय संस्थेच्या पदाधिकारी आहेत. त्यांना कविता, कथा लेखनाची आवड असून, ग्रंथाली च्या अभिवाचन स्पर्धेत सायली देसाई ह्या मैत्रिणी सोबत तृतीय पारितोषिक विजेत्या आहेत…
नमस्कार .
एक दीर्घकथा लिहिण्याचा प्रयत्न केलाय.. अभिप्राय जरूर कळवा…
स्वप्नरंग स्वप्नीच्या ( 1 )
आज कितीतरी दिवसांनी निवांत बसून ती अल्बम चाळत होती.. आजकाल मोबाईल मध्ये कॅमेरा असल्याने फोटो काढणं तस सोप्प झालंय, तरीही अल्बम बघताना ची मजा काही औरच असते, असा विचार तिच्या मनात आला आणि रोमीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून गेला..
“फोटो त चवळीच्या शेंगेसारखी दिसतेय मी..आणि अवि..अविनाश ही किती सडपातळ होता..” खर तर आपल्याला साडीची अजिबात सवय न्हवती..तो बोंगा सांभाळताना चांगलीच फजिती होत होती…
अवीने खूप सांभाळून घेतलं.. मराठी पध्दतीने लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी चर्च मध्ये ही..फादर नी जेव्हा विचारलं अविनाश ला, तेव्हा “त्याने शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम करीन, आणि तिला सुखात ठेवीन.” अस म्हणल्यावर डोळ्यात पाणी आलं होत..
अविच्या फोटोवरून हात फिरवत रोमी म्हणाली, “येस ! डिअर.. यु मेड माय लाइफ ! पण एकटीला सोडून कसा रे गेलास पुढे ?”
तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं..
पुढचा फोटो बघून रडता, रडता हसू ही आलं..घास भरवतानाचा फोटो होता तो..अविनाश ने तोंडाचा मोठा आ केलेला..
त्याला खूप भूक लागली होती..
त्याने कानात हळूच सांगितलं,” “लाडू भरव मला, लवकर..भूक लागलीय..” त्याच्या कॅमेरामन मित्राच्या लक्षात आली ही खुसुरफुसुर..त्याने बरोबर डाव साधला.. तो फोटो बघून सगळे खूप हसले..
सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले..
लग्न झालं ..अविनाश च्या घरच्यांचा विरोध पत्करून त्याने लग्न केलं होत..
तो विरोध खर तर योग्यच होता..

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
आपल्या दिलखुलास प्रतिकयेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आपणही इतरांना नेहमीच प्रोत्साहन देत असता.आपल्या पोर्टल ला मिळणारे आपले सहकार्य मोलाचे आहे. असाच लोभ कायम असू द्या.
अरे वाह! आता आमच्या प्रतिभा चांदूरकर मॅडम चे लिखाणही वाचायला मिळणार का?
देवेंद्रजी तुम्हाला खरोखर धन्यवाद! तुम्ही आमच्यातील किती लोकांना लिहिते केले आहे.
आणि एकदा लिहिले की मग ते लिहीतच राहतात.कारण तुमचे प्रोत्साहन, वाचकांचे कौतुक त्यांना मिळते.या सारख्या नोंदी ठेवणे सोपे नाही.
देशोदेशीच्या गोष्टी येथे वाचायला मिळतात.किती देशांशी तुमचे संपर्क सुरू आहेत हे पाहून नवल वाटते.
खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला.