घरी येऊन दोन दिवस झाले, सगळी आवराआवर झाली..त्यांनी आणलेल गिफ्ट सर्वांना आवडलं..
एक दिवस तिचा फोन वाजला, मेंटल हॉस्पिटल मधून होता.. जेनी, तिची आई सिरीयस आहे असा..तिने अविनाश ला कळवलं..
तिथे अविनाश, ती आणि रिटा मावशी जेमतेम पोचल्या आणि जेनी गेली..
तिचे अंत्यसंस्कार करायला डँड आले, नेहमीसारखे रिकामा खिसा घेऊन, ते ही दारूच्या नशेत..ते बघून तिने पैसे पुढे केले मग अंत्यसंस्कार झाले..
मन उद्विग्न झालं.. अंत्यसंस्कार झाल्यावर रोमीला म्हणाले, “मी जन्म दिलाय तुला.. माझ्याकडे पैसे नाहीत आता..माझ्या खर्चाची जबाबदारी तू घ्यायला हवीस..मला पाच हजार रुपये दे आत्ता..”ते बघून अविनाश ने पैसे दिले..रिटा मावशी नको म्हणत होती तरी..!
“devil, raskal, bitch तुला नरकात ही जागा मिळणार नाही..माझ्या बहिणीच आणि तिच्या पोरीचं आयुष्य हेल बनवून टाकलं ह्याने” अस म्हणत रागारागाने ओरडत होती..
अविने आणि रोमीने तिला शांत केलं..ती म्हणाली अविनाशला ह्याचा काहीतरी बंदोबस्त कर…नाहीतर हा त्रास देईल माझ्या पोरीला..
अविनाश ही विचार करत होता..कायमचा बंदोबस्त करायचा, पण तो वकील, कमिशनर ह्याचा सल्ला घेऊनच..! वडील असे असतात ह्याची कोणी कल्पना ही करू शकणार नाही, पण ते वास्तव होत..!
अविनाश च्या आईला ही कळलं, त्यांनी रोमीला जवळ घेतलं प्रेमाने…। मनात खूप कणव दाटून आली.. मनात म्हणत होत्या, खरच गुणी पोर आहे ही..हनिमूनला गेली तेव्हा जाणवलं की किती सेवा, प्रेम करत होती ते..तिची मावशी म्हणाली ते खर आहे, पोर प्रेमाची भुकेली आहे..!
त्या घराने तिला मनापासून आपलं म्हणल होत..! रोमीच्या आयुष्यात सुखाने पाऊल टाकलं होत..! ते ही इतक्या परीक्षा घेऊन..
किती आणि काय काय परीक्षा दिल्या होत्या आयुष्यात !

क्रमशः
– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800