जाऊ कधी माहेरी
ओढ लागे सासरी
आठवण त्रस्त करी
बरसता श्रावणसरी
लाभो पति हर हरि
कुमारिका व्रत करी
तृप्पता राहे संसारी
जीवन हो सुखकरी
सणालेहरितालिका
मनात वाजे बासरी
मैत्रिणीअन् शेजारी
भरून जाई ओसरी
नाचते मनात मयुरी
पुजिता शिव शंकरी
अभिषेक धार धरी
बेलपत्र अर्पण करी
उपवास कडकजरी
तृप्तता कशी अंतरी
प्रसन्न गौरी शंकर
सुखाची दे खातरी
खेळात रंगत मैतरी
जागरण करे रातरी
दडपण होई हलके
रमून चालले सासरी
सणामागे प्रत्येक गं
लपे गुपीत काहीतरी
धर्म आणि शास्त्राची
जमली सुरेख मैतरी
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800