Sunday, March 16, 2025
Homeबातम्या'हवामान रक्षक' गव्हाणे सर

‘हवामान रक्षक’ गव्हाणे सर

हवामान बदल व हवामान न्यायावर जगातील सर्व देश, सरकार, संस्था व नागरिकांनी इंटरनँशनल ऑर्गनाइज़ेशन फ़ॉर एज्युकेशनल डेवलपमेंट  (आयओइडी) या शिक्षण व उच्चशिक्षणाला वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आयोजिलेल्या “हवामान बदल” व “हवामान न्याय” या विषयावरील आंतरराष्ट्रीय डीजीटल परिषदेचे उदघाटन माल्दवाचे माजी पंतप्रधान चीरील गाबुरीसी यांचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी आयओइडीचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार शर्मा हे होते.

या “हवामान न्याय“ या विषयावरील एक दिवसीय परिषदेच्या अंतीम सत्रात माजी कुलगुरू व माध्यमतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना इंटरनँशनल ऑर्गनाइज़ेशन ऑफ़ एजुकेशनल डेवलपमेंट या संघटनेतर्फे “आंतरराष्ट्रीय हवामान रक्षक” हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

प्रा.डॉ. सुधीर गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परिसर विकास समितीचे अध्यक्ष नात्याने २०० हून अधिक एकर पडीक जमिनीवर जिरायत फळबाग प्रकल्प प्रत्यक्षात राबविला आहे.

विद्यापीठातील फळबाग

हा प्रकल्प “टार्न्फॉरमिंग वेस्ट लँड टू फ़्रूट लँड“ म्हणून मानला जातो. यात सुमारे १५ हजार चिंच, आवळा, आंबा, सिताफळ, नारळ, चिकू फळझाडे यांची यशस्वी लागवड करून औरंगाबाद शहरासाठी विस्तारित ऑक्सीजन हब यशस्वीरित्या उभा केला गेला आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे, प्रा. के. पी. सोनवणे, कृष्णा भोगे, प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या प्रकल्पाला पाठबळ दिले. याशिवाय प्रा. सुधीर गव्हाणे यांनी पर्यावरण व हवामान बदल, रीसायकलींग उद्योग, ग्रीन टेक्नोलॉजी आदिंवर सातत्याने केलेल्या पोस्ट व लेखनाचीही नोंद केली गेली.

प्रा. गव्हाणे यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स व मिलेनियम डेवलपमेंट गोल्स, ग्लोबल ग्रीन ग्रोथ वर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या अभ्यासक्रमात पद्व्युत्तर स्तरावर भारतात प्रथमच “शाश्वत विकास संवाद“ व “पर्यावरण संवाद“ हे विषय सुरू केले. तसेच सोलर प्लँट व जलसंधारण योजना राबविली होती. या सर्व कार्याची नोंद घेऊन हा “हवामान रक्षक पुरस्कार” दिला गेला आहे.

प्रा डॉ सुधीर गव्हाणे सरांचे आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलतर्फे हार्दिक अभिनंदन 💐

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हवामान रक्षक श्री गव्हाणे सरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments