Saturday, July 5, 2025
Homeसेवा२ जावांचा कलात्मक उपक्रम -

२ जावांचा कलात्मक उपक्रम –

दोन जावा म्हणजे थोडे हिंदुस्तान पाकिस्तानच असते, नाही का ? तुमची संपत्ती किती आणि आमची किती, तुमची मुलं अशी, आमची मुलं अशी….असा सगळा मामला असतो.

पण नवी मुंबईतील २ जावांनी अगदी सख्या बहिणीही लाजतील, अशा प्रकारे एकत्र येऊन महाराष्ट्रासह देश-परदेशातील ४ हजार कलाकार आणि त्यांच्या ३ हजार कार्यक्रमांच्या एकत्रित माहितीसाठी अभिनव वेबसाईट बनवली आहे.

कलेची आवड असणाऱ्या ऋचा राज्याध्यक्ष आणि राजश्री राज्याध्यक्ष या जावांनी ही वेबसाईट सुरू केलेली आहे. त्यांनी जवळजवळ १२ वर्षांपूर्वी बी पेरलं होतं आता त्याचा एक सुंदरसा वृक्ष तयार झालेला आहे.

रसिक जनांना आपले कलाकार एकाच ठिकाणी मिळावे, आपले गुरु एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.

या वेबसाईटमुळे नागरिकांना घरबसल्या कोणताही कार्यक्रम आयोजित करता येईल. अगदी बारशापासून पंच्याहत्तरी पर्यंत कोणताही सण-उत्सव, मैफल यासाठी लागणारे कार्यक्रम या वेबसाईटवर आहेत. घरगुती कार्यक्रम असो वा कॉर्पोरेट इव्हेंट, हर प्रकारचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे
कार्यक्रम निवडू व पाहू शकता.

कोरोनात जवळ जवळ सगळ्यांनी इंटरनेट द्वारा शिकवलं. पण या दोघींनी आठ वर्षांपूर्वीपासूनच ऑनलाइन उपक्रम सुरू केला होता. देशाबरोबरच अमेरिका, इंग्लंड, जपान, दुबई, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, सिंगापूर अशा विविध देशांमधून विद्यार्थी शिकत आहेत. उत्तमोत्तम गुरू त्यांना शिकवित आहेत.

ऑनलाईन क्लासेस मध्ये सगळ्या प्रकारची वाद्ये तसेच शास्त्रोक्त संगीत नंतर सुगम संगीत, हिंदी-मराठी गाणी तुम्ही शिकू शकता. शास्त्रोक्त संगीत अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत आहे. नृत्य कलेमध्ये कथ्थक, भरतनाट्यम यांसारखे विविध शास्त्रीय नृत्य प्रकार, तसेच लोक नृत्य, पाश्चात्य नृत्य, हिंदी चित्रपट नृत्य सुद्धा शिकू शकता. जवळ-जवळ सगळ्याच कला शिकवल्या जातात.

हा उपक्रम म्हणजे कलाकारांचा आणि कलेचा खजिनाच आहे. आणि म्हणूनच सर्व कलाप्रेमींसाठी एक नवीन गोष्ट म्हणजे कलेविषयीचा ज्ञानकोष सुरू होत आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांविषयीची माहिती जसे की, मंगळागौर, भोंडला, डोहाळ जेवण, बारसे, गणेशोत्सव, लग्नसंगीत इत्यादि तसेच विविध रागांची माहिती, विविध कला विषयक माहिती, घरबसल्या एका क्लिकवर मोफत स्वरूपात बघू येऊ शकेल.

अशा विविध कलांविषयीची माहिती घेऊन आम्ही लवकरच येत आहोत.
तोवर वाट पाहू या !

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹अभिनव उपक्रम 🌹

    अभिनंदन 🌹🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments