आई बाबा या, बसा
जेवून घ्या पोटभर अन् द्या आशिर्वाद
कारण आज आहे श्राध्दचा वार
फोटो मधल्या आईचे डोळे पाणावले
कारे ! बाबा, घातलास
पंच पक्वान्नाचा घाट
आणि बोलावितोस काक,
जिवंतपणी दोन वेळेच्या
जेवणाला केले होते मोहताज
बालपणी माझी आई, माझी आई
भांडून घट्ट मीठी मारल्या,
मोठेपणी तुझी आई, तुझी आई
म्हणताना भावना नाही कारे दाटल्या
लहानपणी तुमचा वेंधळेपणा
कौतुकाने सहन केला,
आम्हा म्हाताऱ्याचा आंधळे, बहिरेपणा
तुम्हा सोसवेना झाला
मानले शिस्त लावण्याच्या नादात
बाप कठोर वागला,
पण तुमच्या ईच्छापूर्ती साठी
त्याची फाटकी बनियन अन्
झीजलेल्या चपला नाही का रे दिसल्या
नको ते वडे आणि नको ती खीर
आशीर्वाद आहे तुमच्यावर
फक्त तुमची मुलं मोठी
होईस्तोवर धरा थोडा धीर
धरा थोडा धीर

— रचना : सौ.शितल अहेर. खोपोली, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

खरंच खूपच छान 👌👌👌
Khoob Chan 👌
Very nice