त्रिदेव चमत्कार
त्रिमूर्ती अवतार
त्रिगुण साकार
नाद ओंकार
गुरूंचा गुरू
तात कृपाळू
माय कनवाळू
सदा मायाळू
सृजनाचा गाभा
परब्रह्म आभा
विष्णूचा धागा
विश्वा सूभगा
ज्ञान भक्ती
प्रेरणा स्रोत
श्रद्धेत शक्ती
शांतीचा दूत
चरण शुभंकर
दत्त दिगंबर
घर मंदिर
सर्वांगी सुंदर
साक्षात चमत्कार
जगण्याचा आधार
भवसागर पार
साष्टांग नमस्कार
— रचना : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800