व्हायचे होणार असते
टाळता ते येत नाही
वेळ गेलेली पुन्हा
ती काही केल्या येत नाही
हातचे सोडू नका धावू
नका पळत्याकडे
हातचे निसटून गेले ते
उद्या हातात नाही
तोडणे सोपे परंतू
जोडण्या आयुष्य जाते
सोबती नाती जपावी
नाटकी संकेत नाही
गर्द संध्याकाळच्या
दाट झाल्या सावल्या
झोपलेला सूर्य काही
पश्चिमेला येत नाही
इंद्रिये संवेदना ही
तापलेले हे निखारे
पेटलेल्या विस्तवाची
राख सहसा होत नाही
पाहतो आहे वरूनी सूत्र
ही त्याच्याच हाती
तोच सांगे ती दिशा
ते तुझ्या हातात नाही

— रचना : विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

खूप छान रचना,👌👌👌👌