वेष्टनातल्या वस्तूवर लिहू नये
नाव कधी स्वतःचं
कधी वाढदिवसही
असू शकतो तुझा
मग मीच कसा
वेष्टनात विस्कटून
घेऊ स्वतःला
सर्व वस्तू वाढदिवशी स्वीकारू नयेत कधी
तूच म्हटलेलं आताशा सर्वच वेष्टने
उघडताना चुरगळलेल्या कागदात
का शोधावी ती वस्तू
जी नव्हती कधी माझी

– रचना : शफीक शेख