नमस्कार, वाचक हो
वैशिष्ट्यपूर्ण असे प्राणी, पक्षी, वनस्पती असलेले केरळ मधील अजून एक ठिकाण म्हणजे “सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क” Silent valley – शांती घाट थोडक्यात नैसर्गिक शांती – जी आपणास उल्हासित करते, प्रफुल्लित करते, चैतन्य देते.
पालकाड जिल्ह्यात मन्नारकाड तालुक्यामध्ये स्थित हे खास जंगल आहे. निलगिरी पर्वतामध्ये हे उद्यान येते. पालकाड पासून साधारण ८० किलोमीटर तर कोईमतूर पासून साधारण ६० किलोमीटर अंतर पडते.
इथे यायला जवळचे विमानतळ म्हणजे तामिळनाडू मधील कोईमतूर हेच आहे .
जैव विविधतेबाबत हे उद्यान संपूर्ण जगतात प्रसिद्ध आहे.
तिथे पोहचल्यानंतर तिकीट घेऊन त्यांच्या गाडीमधून आपणास सफारीसाठी जावे लागते.
विविध प्रकारचे अनेक जीव इथे आपणास पाहायला मिळतात.
अनेक प्रकारची फुले, फुलपाखरे, भुंगे, किडे, पक्षी आणि प्राणीही.इतकी जैव विविधता की विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि निसर्ग प्रेमींच्या बुद्धीला खास मेजवानी म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही.
इथले लोक याला सैरंध्रीवन असे म्हणतात. अशी मान्यता आहे की पांडव अज्ञातवासात असताना इथे येऊन राहिले होते. त्यामुळे द्रौपदीचे दुसरे नाव सैरंध्री म्हणून याला सैरंध्रीवन असे म्हणतात आणि कुंती पांडवांची माता. याच निलगिरी पर्वतातून वाहत येत समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नदीस कुंती नदी म्हणतात.
नैसर्गिक विविधता, सुंदरता, शांतता असं अतुलनीय मिश्रण म्हणजे हे उद्यान. जैवविविधता पाहण्यास एकदा तरी इथे यायलाच पाहिजे हा.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800