Saturday, July 5, 2025
Homeपर्यटनकेरळ : निल्यामपथी

केरळ : निल्यामपथी

नमस्कार, वाचक हो.
केरळ मधील पालघाट जिल्ह्यात अजून एक पूर्ण जंगलाने व्यापलेलेले निसर्गरम्य ठिकाण
म्हणजे निल्यामपथी – Nelliampathy.
पालघाट पासून साधारण ६० किलोमीटर अंतरवर येते. हेच जवळचे रेल्वे स्टेशन तर जवळचे तामिळनाडू मधील कोईमतूर विमानतळ आहे.

हिरव्यागार रंगात रंगलेले जंगल पश्चिम घाटाचा भाग आहे. संपूर्ण घाट असलेला रस्ता अगदी hairpin bends. निल्यामपथीला गरिबांची उटी असंही म्हणतात. पावसाळ्यात पाऊस पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारण सप्टेंबर नंतर इथे जाण्यासाठी योग्य वेळ आहे.

इथे जाताना अगोदर लागते ते पोतुंडी धरण.  (pothundi dam) हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे. अशी मान्यता आहे की सितारकुंड  (Seetharkundu) येथे राम, लक्ष्मण, सीता यांनी इथे काही काळ आराम केला होता. सीतेने इथल्या जल कुंडात स्नान केले होते. त्यामुळे यास सीताकुंड असे म्हणतात.

चहाचे मळे, कॉफीचे मळे आणि संत्र्याच्या बागा लक्ष वेधून घेतात. रम्य वनराई, विविध पशु, प्राणी, पक्षी, भरभरून कोसळणारे धबधबे म्हणजे ईश्वराचा सुंदर कलाकारी. इथले थंडगार वातावरण चैतन्य देते. मन प्रफुल्लित करते. जादुमय वातावरण भारावून टाकते.

एक मात्र नक्की आहे, जरी हा भाग छोटासा असला तरी सौन्दर्याने नटलेला आहे आणि हे पाहून तृप्ती होते हे मात्र अगदी खरे आहे.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील
पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments