कंपनीत असताना अविनाश च्या लेक्चर्स ने ती खूप प्रभावित झाली..! कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं होत की तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंट असा, तुम्ही जर प्रोडक्शन वाढवण्यासाठी काम केलंत, तर इनक्रिमेंट आणि इंसेंटिव्ह विथ प्रमोशन..!
सेल्स टीम सेल ची जबाबदारी बघेल..!
रोमी ने अविनाश ने दिलेल्या सूचनांचा अभ्यास केला..! त्यात स्वतःची आयडिया ही वापरली..!
सर्वात आधी तिने कंपनीतल्या प्रत्येक कामगारां बरोबर चांगले रिलेशन डेव्हलप करायला सुरुवात केली..!
मुळात नवीन काही करायचा ध्यास ही रोमीची जुनी सवय होती..! नवीन नवीन गोष्टी शिकण आणि त्या प्रत्यक्षात उतरवणं, हा एक छंदच होता अस म्हटंल तरी चालेल…!
तिच्याबरोबर एक कलीग होता, रोहन म्हणून..! त्यालाही हे सगळं मिळवायचं होतच..! दोघेही एकत्र काम करायचे बरेचदा..!
रोमीला पहिल्या पासून कष्टाची सवय होतीच..! तिच्या त्या स्पीड पुढे सारे फिक्के पडायचे..!
आणि त्याचा परिणाम म्हणजे यश हमखास..!
तब्बल शंभर कामगारांनाकडून तिने यशस्वी रित्या काम करून प्रोडक्शन वाढवलं…!
झालं..!
रोहन ची जेलसी सुरू झाली..! त्याने युनियन लीडर ला हाताशी घेऊन, हे सगळं काम त्याने करवून घेतलं अस मॅनेजमेंट ला सांगितलं..!
कस असत ना की काही लोक कामात खूप हुशार, परफेक्ट आणि मेहनती असतात, पण राजकारणात मागे पडतात…!
रोमीच तसच झालं..! तिला राजकारण जमल नाही..! प्रमोशन आणि बाकी सर्व फायदे रोहन ला देण्याचं उच्च अधिकाऱ्यांनी ठरवलं..!
रोमी खूप निराश झाली..! रोज आपल्या बरोबर उठणारा, बसणारा रोहन अस काही करेल, अस
तिला वाटलंच नाही..!
एकदा ती कॉफी प्यायला कॅन्टीन मध्ये बसली होती..! कितीही नाही म्हणल तरी चेहऱ्यावरची निराशा लपत न्हवती..!
तशीही अविनाश ला ती खूप आवडली होती..! तिच्या कामाबद्दल, स्वभावाबद्दल ऐकून होता तो..!
“hi.. इथे बसू का सोबत” अविनाश ने विचारलं..!
“yes..! Yes.. सर..!” अस ती गडबडीत म्हणाली..!
सर्वात मोठा दुर्गुण म्हणा किंवा गुण म्हणा, अविनाशला ज्या मुद्यावर बोलायच असेल त्या व्यक्तीला, फक्त हाय, हँलो आणि कसे आहात एवढ विचारून तो डायरेक्ट हात घालायचा..!
कित्येकदा कोणाला आवडायचं, त्याच अस वागणं तर कोणाला नाही आवडायचं..! त्याला काही फरक पडत नसे..!
आत्ताही असच झालं..! त्याने रोमीला सांगितलं की काहीतरी झालंय आणि तुझा चेहरा ते सांगतोय..! तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस..!
बस्स..! सरळ मुद्याला हात आणि प्रामाणिकपणे विचारणा…!
रोमीने सर्व सांगितलं, काय काय झालं ते…!
अविनाश म्हणाला, ” don’t worry..!”
अविनाश ने काय केलं ते माहीत नाही पण सगळी सूत्र फिरली आणि ते प्रमोशन सन्मानाने रोमीला
मिळालं..! काय केलं होतं त्याने ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800