Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यसखे सृष्टीतले

सखे सृष्टीतले

मधुसिंधू काव्य
~~~~~~~~~~
मैत्रीचे नाते
माझे सजीवाशी
कुत्रा मांजराशी
चराचराते

चिमण्या काऊ
येतात दारात
दाणे टिपतात
तो  देते खाऊ

नाते जुळले
भाव भावनांचे
ते एकमेकांचे
बोल जाणले

मैत्री श्वानाची
निस्वार्थ निखळ
प्रेमाचे ओघळ
जिवाभावाची

प्राणी हे मूक
नयने वदती
संवाद साधती
प्रेमाची भूक

अरुणा मुल्हेरकर

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अरुणा मुल्हेरकर यांची पक्षी प्राण्यांविषयी आस्था दाखवणारी
    मैत्रीचे नाते हे मधुसिंधु काव्य छानच…
    चराचरावर प्रेम करा ..असा संदेश देणारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा