Thursday, December 25, 2025
Homeबातम्यामाझा गणपती, माझा संकल्प

माझा गणपती, माझा संकल्प

प्रतिवर्ष राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा निमित्त 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये नेत्रदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

नेत्रदान प्रक्रियेला चालना देण्यासाठी तसेच लोकांना महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी या महान मोहिमेचा उत्सव साजरा केला जातो.

जगातील पाच अंधांपैकी एक भारतीय आहे. म्हणजे किमान 46 लाख भारतीय कॉर्निया अंधत्वाने ग्रस्त आहेत तर नेत्रदानाचे प्रमाण केवळ 35,000 डोळे इतकेच आहे. डोळ्यांची मागणी आणि पुरवठा यात मोठे अंतर आहे.

असे आढळून आले आहे की दरवर्षी सुमारे 20,000 नेत्र अंधत्वाची नवीन प्रकरणे जोडली जातात. बहुसंख्य अंध तरुण आहेत (जखम, संसर्ग, व्हिटॅमिन अ ची कमतरता, कुपोषण, जन्मजात किंवा इतर कारणांमुळे) त्यांची दृष्टी केवळ कॉर्नियल प्रत्यारोपणानेच परत मिळवता येते. म्हणून कॉर्नियाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत पूर्ण करण्यासाठी तरुण आणि वृद्ध दोघांसह समाजातील लोकांना प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून सन 2011 पासून नवी मुंबई परिसरात कार्यरत आहे. प्रभात या ZTCC, मुंबईशी संलग्न असणाऱ्या संस्थेच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात.

गणेशोत्सव हे सामाजिक बदलाचे एक चांगले माध्यम म्हणून लोकमान्य टिळकांनी याची सुरवात केली होती. आपण सर्व कोरोना नंतर मनोभावे गणेशोत्सव साजरा करीत आहोत. गणेशोत्सवाचे १० दिवस वेग वेगळे उपक्रम आपण राबवित आहोत.

या यावर्षी गणेशोत्सव व नेत्रदान पंधरवडा एकाच कालावधीत संपन्न होत आहे. या अनुषंगाने नेत्रदानपेटी गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या नेत्रदानपेटी च्या माध्यमातून QR कोड द्वारे गणेश भक्त आपला संकल्प श्री गणेश चरणी अर्पण करतील. या उपक्रमांतर्गत नेत्रदान ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृती करून ज्या मंडळाकडून जास्तीत जास्त नेत्रदानाचा संकल्प केला जाईल त्या मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या जनजागृती अभियानामध्ये न.मुं.म.पा. शाळेतील दहावीच्या परीक्षेमध्ये अंध विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेला रंजनकुमार ठाकूर हा ब्रँड अँबेसिडर आहे. या उपक्रमांतर्गत 25 ऑगस्ट 2022 रोजी नेत्रदानपेटीचे अनावरण करण्यात आले.

25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली त्या मंडळांना गणेश चतुर्थी अर्थात 31 ऑगस्ट 2022 रोजी नेत्रदान पेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या. 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 पर्यंत नोंदणी झालेल्या नेत्रदान संकल्पानुसार स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.

या उपक्रमासाठी लक्ष्मी नेत्रपेढी (आय बँक) पनवेल, ROTTO, SOTTO & ZTCC, Mumbai, The Federation of Organ & Body Donation यांचे सहकार्य लाभले आहे.

नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ ब्रँड अँबेसिडर रंजन ठाकूर यांच्या शुभहस्ते, ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. सुहास हळदीपुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्रदानपेटीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, द फेडरेशन ऑफ ऑर्गण अँड बॉडी दोनेशन चे शैलेश देशपांडे, प्रभात ट्रस्टचे अध्यक्ष नेत्र तज्ञ डॉ. प्रशांत थोरात उपस्थित होते.

गणेशोत्सव साजरा करताना अश्या उपक्रमांध्ये सहभागी होणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे ओळखून गणेशोत्सव मंडळांनी प्रभाच्या सहाय्यता कक्षाशी 9869432224/8104781713 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे .

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹खुप छान उपक्रम, अजून आपल्याकडे जणजागृती होणं गरजेचे आहे. 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”