आभाळाच्या उरातून
पाऊस फुटतो
झाडांच्या पानावर
येऊन थबकतो
अनाहुत पाहुणा होवून
कधी पाऊस येतो
कधी हट्टी मुलासारखा
पाठीमागे लागतो
पाऊस घालतो धिंगाणा
सरीवर सरी कोसळून
देतो भिरकावून छत्री
हातातली हिसकावून
कधी होवून अचानक बेपत्ता
जीव शेतकऱयांचा ठेवी टांगणीला
कधी पूर एकाएकी आणून नदीला
करी बेघर घरातल्या माणसाला
असा कसा तुझा हा खेळ
कधी ना जुळे कसलाच मेळ
हुलकावणी जातोस देवून
करतोस शेतकऱयांचा खेळ
तुझी हरएक वर्षाची ही वारी
चुके न कधी आमच्या दारी
आला नाही तू तर आम्ही उपाशी
तुझ्याविन आम्ही भिकारी भिकारी

– रचना : दीपक शेडगे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
